लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड: तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कारवाई, लाचखोर गजाआड

ACBची तडफड, तीन लाचखोर रंगेहाथ

लाल दिवा-नाशिक, ८ जानेवारी २०२५:लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नाशिक जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कारवाई करत लाच घेणाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये एक ग्रामसेवक, एक खाजगी दलाल आणि एक तलाठी यांचा समावेश आहे. तिन्ही घटनांमध्ये तक्रारदारांनी धाडस दाखवून लाचलुचपत विभागाला माहिती दिल्याने कारवाई यशस्वी झाली.

  • प्रकरण १: ग्रामसेवकाकडून ३० हजारांची लाच

इगतपुरी तालुक्यातील भरवज येथील ग्रामसेवक श्रीमती सुवर्णा छगन आहेर (३९) यांना आदिवासी जमीन खरेदी प्रकरणात ३०,००० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ४० वर्षीय जमीन व्यवहार एजंट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या अर्जाची चौकशी ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आली होती. श्रीमती आहेर यांनी ठराव देण्यासाठी लाच मागितली. पोलीस निरीक्षक श्री. अमोल सदाशिव वालझाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

  • प्रकरण २: खाजगी दलाल ७ हजारांची लाच घेताना गजाआड

तहसील कार्यालय तळोदा येथे शेतकऱ्याची फेरफार नोंद करण्यासाठी ७,००० रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी दलाल राजेंद्र कुमार नारायण क्षत्रिय (५६), रा. सोमावल यांना अटक करण्यात आली. ३७ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलोपार्जित शेतीची नोंद बदलण्यासाठी त्याने अर्ज केला होता. क्षत्रिय यांनी लाच मागितली. पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

  • प्रकरण ३: तलाठ्याला १००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ

येवला तालुक्यातील तलाठी श्री. बापू वामनराव पवार (५४) यांना ७/१२ उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी १,००० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ४९ वर्षीय तक्रारदाराने आपल्या वडिलोपार्जित शेतीची नोंद पत्नी व मुलाच्या नावावर केली होती. चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी पवार यांनी लाच मागितली. पोलीस उपअधीक्षक श्रीमती स्वाती पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

  • सर्व कारवाया पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

तिन्ही आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास, त्यांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (दूरध्वनी: ०२५३२५७८२३०, टोल फ्री: १०६४) संपर्क साधावा.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!