मुलाने पूर्ण केले वडिलांचे स्वप्न, भेट दिली ‘रॉयल एनफील्ड’ !
नाशिक – “मला नेहमीच बुलेट घ्यायची होती, पण परिस्थिती अनुकूल नव्हती. माझ्या मुलाचा हात दोन वेळा फ्रॅक्चर झाला आणि माझा हा छंद राहूनच गेला. पण माझ्या मुलाने माझे हे स्वप्न पूर्ण केले,” असे भावुक उद्गार श्री. धनंजय शिंदे यांनी काढले.
श्री. शिंदे यांचा मुलगा चाणक्य याने नुकतेच जुलै महिन्यात नोकरीला सुरुवात केली. आपल्या पहिल्याच पगारातून त्याने वडिलांना ‘रॉयल एनफील्ड’ ही भेट दिली. १५ ऑगस्ट २०२४ रोजी चाणक्यने वडिलांना सरप्राईज देत थेट शोरूममध्ये नेले आणि त्यांच्या आवडत्या रंगाची बुलेट भेट दिली.
वडिलांच्या डोळ्यातील आनंद पाहून चाणक्यलाही अत्यानंद झाला. “आई-वडिलांनी नेहमीच माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो”, असे चाणक्यने यावेळी सांगितले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1