फाळके स्मारक व वॉटर पार्क’ रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी मंत्री भुसेंचे मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्र्यांना साकडे……..पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे मागणी केली…….!

लाल दिवा-नाशिक,ता.११: : मनपा क्षेत्रातील चित्रपट महर्षी “दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्क” रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकसीत करणेकरीता निधी उपलब्ध होवून कार्यान्वित होण्याबाबत नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने पांडव लेण्या पायथ्याशी सुरू करण्यात आलेल्या स्मारकाचा कायापालट होण्यास मोठी मदत होणार असून यामुळे नाशिकच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. २३ वर्षांपूर्वी महापालिकेकडून दादासाहेब फाळके स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती. 

  • पत्राद्वारे केलेल्या मागणीत मंत्री भुसे म्हणाले की, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात मौजे पाथर्डी शिवारातील सर्वे नं.२८७ या महानगरपालिकेच्या जागेवर पांडवलेणीच्या पायथ्याशी निसर्गरम्य अशा ठिकाणी महानगरपालिकेने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्क येथे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकसीत करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. नाशिक शहरातील नागरिकांना व पर्यटकांना विविध सुविधा पुरविणे व पर्यटनास चालना देण्याच्या दृष्टीने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्क येथे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकसीत करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी विनंती मंत्री भुसे यांनी पत्राद्वारे केली आहे.

नाशिक मनपा क्षेत्रात मौजे पाथर्डी शिवारातील सर्वे. नं.२८७ या जागेवर महानगरपालिकेच्या मंजुर विकास आराखड्यानुसार रिक्रियेशन सेंटरचे आरक्षण आहे. सदर जागा विकसीत करण्यासाठी व तेथे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे स्मारक होण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी, नाशिक यांनी महाराष्ट्र शासनाची जमीन महानगरपलिकेस ११ हेक्टर ७५ आर क्षेत्र हस्तांतरीत करण्यास मान्यता देणेत आली होती व त्याचा ताबा दि.०९/०४/१९९१ रोजी महानगरपालिकेस शासनाकडून प्राप्त झाला. सदर मौजे पाथर्डी शिवारातील सर्वे. नं.२८७ जागेवर पांडवलेण्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य अशा ठिकाणी महानगरपालिकेने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचे बांधकाम करून ते नाशिकच्या नागरीकांसाठी पर्यटकांसाठी सन २००१ मध्ये खुले केले. त्याच जागेत नंतर वॉटर पार्क देखील सुरू करण्यात आलेले आहे व सुमारे चार एकर जागेवर बुध्द विहार विकसीत करणेत आलेले आहे.

सदर ठिकाणी मनपा मार्फत उद्यान, संगीत कारंजा, ओपन थिएटर, संग्रहालय, जॉगींग ट्रैक इत्यादी विकसीत केले आहे. सद्यस्थितीत सदर स्मारकास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सदर चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्क येथे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर नाशिक शहरातील नागरीकांना विविध सुविधा पुरविणे उदा. थिम पार्क करणे, सायन्स सेंटर उभारणे, वॉटर पार्क मधील नवीन उपकरणे बसविणे, अम्युझमेंट पार्क, अॅडव्हेंचर पार्क, फिल्म सिटी तयार करणे इ. प्रकारचे उपक्रम राबविल्यास सदर ठिकाणी नागरीकांचा प्रतिसाद वाढण्यास मोठी मदत होईल व पर्यटनास चालना मिळेल, चित्रपट निर्मिती क्षेत्राचा सुध्दा प्रतिसाद मिळू शकेल व नाशिकचा नावलौकीक वाढण्यास मदत होईल. 

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक च वॉटर पार्क येथे रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास होण्यास नागरीकांचा प्रतिसाद वाढण्यास मोठी मदत होईल व पर्यटनास चालना मिळेल शहराच्या नावलौकीकात भर पडेल असे मत मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक व वॉटर पार्क येथे रामोजी फिल्म सिटी च्या धर्तीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडव्य मार्फत विकसीत करणेकामी अथवा मनपा मार्फत विकसीत करणेकामी निधी उपलब्ध करण्यात यावा ही विनंती मंत्री भुसे यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!