तब्बल.. १२ किलो गांजा पकडला.. दोघेजण जेरबंद ; ६,३०,००० मुद्देमाल हस्तगत…. गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहरची कामगिरी…!
लाल दिवा-नाशिक,११: मा. पोलीस आयुक्त साो. नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांवर कारवाई करून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणे बाबातच्या सुचना दिलेल्या होत्या.
त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट ०१ चे पोलीस अधिकारी व अंमलदार असे अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेत असतांना पो. ना. विशाल देवरे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर, म्हसरूळ शिवार, नाशिक येथे एक इसम त्याचे स्विफ्ट कार मधुन गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे.
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे,पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णु उगले, पोलीस अंमलदार , पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस हवालदार प्रदिप म्हसदे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल काठे, शरद सोनवणे, प्रविण वाघमारे, नाझीमखान पठाण, देविदास ठाकरे, पोलीस नाईक.प्रशांत मरकड, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, चालक सपोउनि. किरण शिरसाठ अशांचे दोन पथके तयार करून आडगाव म्हसरूळ लिंक रोडवर मारूती स्विफ्ट कार कमांक एम एच १५ सी. डी.०३१७ हा आल्याचे दिसुन आल्याने तीवर छापा टाकुन त्यातील राहुल राज पवार रा. पंचवटी नाशिक यास माठ्या शिताफाने पकडले, त्याचे जवळील मारूती स्विफ्ट डिझायर कारची झडती घेता त्यात १२ किलो ०८४ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा माल एका प्लास्टीक गोणी मध्ये भरलेला मिळुन आला, त्यांचे ताब्यातुन मारूती स्विफ्ट डिझायर कार, ०३ मोबाईल फोन असा
एकुण ६,३०,०००/- रूपयाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचा माल त्याने सर्जेराव फकीरा गायकवाड रा.हिरावाडी, पंचवटी, नाशिक याचे कडुन विकत घेतला असल्याचे सांगीतले.
- सदर बाबत म्हसरूळ पोलीस ठाणेस गुरनं.२७१/२०२३ एन डी पी एस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन पुढील तपास सपोनि / हेमंत तोडकर हे करीत आहे. नमुद गुन्हयात दोन्ही इसमांना अटक करण्यात आली असुन त्यांची मा. न्यायालयाने पालीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. संदिप कर्णीक, पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे) नाशिक शहर, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त साो. गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हॅमत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक विष्णु उगले, चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस हवालदार प्रदिप म्हसदे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल काठे, शरद सोनवणे, प्रविण वाघमारे, नाझीमखान पठाण, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, आप्पा पानवळ,अमोल कोष्टी, चालक सपोउनि. किरण शिरसाठ अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे.