पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षा पदी पुजा परदेशी यांची सार्थ निवड

सामाजिक कार्याचा गौरव, पुजा परदेशींना युवा अध्यक्षपद

लाल दिवा-नाशिक,दि.१७:-(प्रतिनिधी) – मागील सात वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सौ. पुजा परदेशी यांची पोलीस मित्र परिवार समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष पदावरून त्यांची ही पदोन्नती झाली आहे.

परदेशी यांनी गेल्या दोन वर्षांत संस्थेमार्फत विविध उपक्रम आणि योजना राबवून संस्थेच्या कार्यात मोलाची भर घातली आहे. पोलीस मित्र म्हणून अनेक कौटुंबिक आणि सामाजिक वादमध्ये त्यांनी मध्यस्थी करून कुटुंबांना आनंद दिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून त्या “पोलीस मित्र गोड दिवाळी” ही अभिनव संकल्पना राबवत आहेत. ज्यांना दिवाळी साजरी करता येत नाही, अशा गरजू कुटुंबांना त्या मदत करतात आणि त्यातूनच आपली दिवाळी साजरी होते असे त्या सांगतात.

त्यांच्या याच सर्व कार्याची दखल घेत संस्थेने त्यांना पदोन्नती देऊन गौरविले आहे. विविध सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. याप्रसंगी बोलताना परदेशी म्हणाल्या, “मी नेहमीच संस्थेप्रति प्रामाणिक राहून वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडेन. तसेच संस्थेचे कार्य अधिक विस्तृत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!