आयटीआय अंबुपाडा येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न….!
लाल दिवा -नाशिक,ता .२० : शासकीय आश्रम शाळा औ. प्र. संस्था.अंबुपाडा ता. सुरगाणा जि. नाशिक या संस्थेत दिनांक १७/९/२०२३ रविवार रोजी महात्मा गांधी जयंती स्वच्छता पंधरवाडा व देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र भाई मोदी यांचे वाढदिवसानिमित्त PM SKILL RUN मॅरेथॉन स्पर्धा व या शैक्षणिक वर्षात गुणक्रम प्रशिक्षणार्थी चा पदवीदान दिक्षांत समारंभ संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र निकुळे सरपंच आंबोडे ग्रामपंचायत व श्री बी.के.भोंडवे सर ,सरपंच ,बेडसे व प्रमुख पाहुणे श्री सयाजी पवार मा. सरपंच,बेडसे ,श्री आवजी पालवी मा. वनक्षेत्र अधिकारी, सौ. मंदाताई भोये मा सभापती पं समिती सुरगाणा,श्री मनोहर जाधव व श्री योगेश वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री एस. डी. मलवाडे ,शिल्प निदेशक ए.आर. काळे .सौ जे यु पवार श्री एस एस गायकवाड ,श्री नानु गायकवाड हे उपस्थित होते