मालेगावचे प्रख्यात सर्पमित्र नितीन पेंटर यांचे निधन
नितीन पेंटर यांचे अकाली निधन
मालेगाव – मालेगावचे प्रख्यात सर्पमित्र आणि ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार श्रीकांत सोनवणे यांचे बंधू, नितीन मुरलीधर सोनवणे (नितीन पेंटर) यांचे दुःखद निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मालेगाव कॅम्प येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नितीन पेंटर हे सर्पमित्र म्हणून मालेगाव परिसरात सुप्रसिद्ध होते. त्यांनी अनेक वर्षे सर्पांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने सर्पप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ श्रीकांत सोनवणे आणि इतर नातेवाईक असा परिवार आहे.
३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मालेगाव कॅम्प येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघेल असे कळविण्यात आले आहे.
मालेगाव कट्टा आणि इतर सामाजिक संघटनांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.