मालेगाव शहर व घोटी परिसरात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणा-यांवर ग्रामीण पोलीसांची कारवाई…!

लाल दिवा-नाशिक,ता.२५ : आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांचे आदेशान्वये ग्रामीण पोलीसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती व अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे आझादनगर पोलीस ठाणे हद्दीत शब्बीर नगर परिसर तसेच घोटी पोलीस ठाणे हद्दीत वासाळी परिसरात अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

दिनांक २३/१२/२०२३ रोजी आझादनगर पोलीसांनी मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे मालेगाव शहरातील शब्बीरनगर परिसरात इसम नामे १) अश्पाक अहमद शेख युसूफ, वय २४, व २) तारीक अहमद शेख युसूफ, वय २६, दोघे रा. शब्बीर नगर मालेगाव यांचे कब्जातून एक लोखंडी धारदार तलवार व एक गोलाकार पाते असलेली धारदार कु-हाड जप्त केली आहे. सदर इसम हे काहीतरी दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीररित्या धारदार घातक शस्त्रे कब्जात बाळगतांना मिळून आले असून त्यांचे विरूध्द आझादनगर पोलीस ठाणे गुरनं २३८/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह भादवि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तसेच घोटी पोलीस ठाणे हद्दीत वासाळी ते बारशिंगवे रोडवर, कचरवाडी-वासाळी शिवारात इसम नामे १) संजय काशिनाथ गभाले, वय ३५, व २) सुधीर गोरख कोरडे, वय ३०, दोघे रा. वासाळी, ता. इगतपुरी असे त्यांचेकडील मारूती इको कारमध्ये एक धारदार तलवार विनापरवाना बेकायदा गुन्हेगारी कारवाया करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळून आले आहे. सदर इसमांविरूध्द घोटी पोलीस ठाणेस गुरनं ६१२/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांविरूध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर, नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अवैध व्यवसायविरोधी हेल्पलाईन कमांक ६२६२ २५ ६३६३ यावर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!