“मालकाचे” कारमधुन ३ लाखांची रोकड लंपास करणारा ड्रायव्हर आरोपी पोलीसांचे जाळयात “भद्रकाली पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी”……!

लाल दिवा-नाशिक,ता.३०:- दि. २३ जानेवारी २०२४ रोजी इसम नामे श्री. गणपत सुखदेव हाडपे रा. गंगापुर रोड, नाशिक हे त्यांचे कामाकरीता जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक याठिकाणी त्यांचे स्कोडा गाडीने चालक नामे प्रशांत गवळी मुळ रा. वाशीम जिल्हा याचेसह गेले होते. त्यावेळी त्यांनी सोबत आणलेले रोख ३,००,०००/- रूपये हे त्यांचे कारचे डॅशबोर्डच्या ड्रॉवरमध्ये ठेवुन ते जिल्हा परिषद कार्यालयात गेले व काम संपवुन पुन्हा गाडीजवळ आले असता चालक प्रशांत गवळी हा गाडीजवळ दिसला नाही. तसेच त्यांनी गाडीत ठेवलेली रोख रक्कम देखील गाडीत मिळुन आली नाही. तसेच चालकाचा फोन देखील बंद असल्याने सदरची रोख रक्कम ही चालक प्रशांत गवळी याने चोरून नेल्याबाबत त्यांची खात्री झाल्याने त्याबाबत त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून । गुन्हा रजि. नं. २८/२०२४ भादंवि कलम ३८१ अन्वये दि. २३/०१/२०२४ रोजी दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्हयातील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मा. डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.

 

त्याअनुषंगाने मा. श्री. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संतोष नरूटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली

 

पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि / सत्यवान पवार व तपास अधिकारी पोउपनि / रमेश शिंदे यांनी आरोपीचा कोणताही ठावठिकाणा व त्याचा कोणताही संपर्क क्रमांक नसतांना सोशल मिडीयाचे आधारे तांत्रिक पध्दतीने तपास करीत असतांना सदर आरोपी हा वेगवेगळी ठिकाणे बदलत जालना याठिकाणी असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने तपास अधिकारी पोउपनि / रमेश शिंदे यांचे अधिपत्याखाली गुन्हे शोध पथकाचे पोहवा / ३७४ नरेंद्र जाधव, पोना/१७६३ संदीप आहेर यांचे पथक तयार करून सदर पथक खाजगी वाहनाने जालना येथे गेले असता आरोपीने पुन्हा त्याचे ठिकाण बदलल्याने त्याचा वेगवेगळ्या अँगलने तांत्रिक तपास करता तो सिरसम, ता. जि. हिंगोली येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने सिरसम, ता. जि. हिंगोली येथे जावुन आरोपीतास ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच आरोपीने गुन्हयातील चोरी केलेली रोख रक्कम १,७०,०००/- रूपये व त्याने चोरी केलेल्या रक्कमेतुन खरेदी केलेला १२,५००/- रूपयाचा मोबाईल असा एकुण १,८२,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्याचेकडुन हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि / रमेश शिंदे हे करीत आहेत.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!