मखमलाबादला रंगला आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार………. भर पावसात अर्धा तास रंगली मानाची कुस्ती…….बरोबरीने सुटली…..!
लाल दिवा : मखमलाबादला भर पावसात मानाची आमदार केसरी कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि बाला रफिक शेख यांच्यात झालेली कुस्ती जवळपास अर्धा तास रंगत चालली होती.परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने पहिलवानांना चिखल अन् पावसामुळे एकमेकांना पकडता येत नसल्याने अखेरीस रंगत चाललेली कुस्ती बरोबरीने सोडवावी लागली अन् दोघाही कुस्तीपट्टूंना विभागून बक्षीस देण्यात आले. कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली .
मखमलाबाद तालीम फाउंडेशन व जय बजरंग तालीम संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही भव्य आमदार केसरी कुस्ती स्पर्धां भरविण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे, मविप्रचे संचालक रमेश पिंगळे, परफेक्ट कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बापूशेठ पिंगळे,” तुझ माझ सपान ” मालिकेतील कलाकार पहिलवान प्राजक्ता चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) विष्णूपंत म्हैसधूणे, मविप्र संचालक लक्ष्मण लांडगे, शेखर ढिकले,म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे, सेंट्रल गोदावरी संस्थेचे संचालक तानाजी पिंगळे, खंडू बोडके,गोकुळ काकड,आबा बर्डे, वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे सुभाष काकड, संजय फडोळ, गणपतराव काकड ,शिक्षण अधिकारी प्रा. बाळासाहेब पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, दीपक निकम ,राजू थोरात, सोमनाथ वडजे, बापू कातड, शिवराम धोंडगे, माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी खासदार स्वर्गीय ॲड. उत्तमराव ढिकले यांच्या आशीर्वादाने आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलवान वाळू काकड यांच्या वतीने गेल्या २४ वर्षांपासून मखमलाबाद येथे भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षीही मखमलाबाद येथील मराठा मंगल कार्यालयाच्या मैदानावर रविवारी (ता..९) सायंकाळी ५ ते ९ या वेळेत कुस्त्यांची दंगल रंगली.आ. अँड. राहुल ढिकले यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले. मानाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि बाला रफिक शेख यांच्यात होणार झाली यातच पाऊसाची दमदार हजेरी लागली. जवळपास अर्धा तास चाललेली कुस्ती बरोबरीने सोडविण्यात आली. यातील दोघांना विजेत्याला दोन लाखांचे बक्षीस दिले आहे. त्याखालोखाल १ लाखाच्या बक्षिसासाठी अनिल जाधव (करमाळा) आणि राजू कदम (नांदेड) यांच्यात कुस्तीची लढत झाली यात अनिल जाधव करमाळा विजयी झाले . ७० हजारांच्या बक्षिसासाठी शुभम शिदनाळे (पुणे) आणि संदीप पोटे (सांगली) यांच्यात झाली यात संदीप पोटे सांगली विजयी झाले.६५ हजारांच्या बक्षिसासाठी विजय मांडवे (करमाळा) आणि बहिरू माने (कोल्हापूर) यांच्यात झाली मात्र ती बरोबरीने सुटली. ६० हजारांच्या बक्षिसासाठी बाळू बोडके (त्र्यंबकेश्वर) आणि समीर शेख (पुणे) यांच्यात झाली.बराच वेळ सुरू असलेली कुस्ती बरोबरीने सुटली, यातील दोघांना बक्षीस विभागून देण्यात आले.५१ हजारांच्या बक्षिसासाठी लक्ष्मण माने (कोल्हापूर) मामा तरंगे (करमाळा) यांच्यात झाली यात लक्ष्मण माने विजयी झाले. विजय सुरडे (नाशिक) आणि नाथा पवार (कोल्हापूर) यांच्यात झालेली कुस्तीही बरोबरीने सुटली. ११ हजारांच्या बक्षिसासाठी गौरव देवरे (चांदवड) आणि ओमकार झाडे (सिन्नर) यात गौरव देवरे विजयी झाले.भाऊसाहेब सदगीर (राजूर) आणि आमिर शेख (मालेगाव) यांच्यात लढत झाली मात्र, ती बरोबरीने सुटली .सार्थक नागरे (नाशिक) संदीप बिन्नर (चांदवड) यांच्यात सार्थक नागरे विजयी झाले.किरण थेटे (दुगाव) आणि ताहूर खान (मालेगाव), यांच्यात कुस्ती सामना चांगलाच रंगला होता मात्र ती देखील बरोबरीने सुटली होते. जिल्हाभरातील कुस्तीपटू आणि कुस्तीप्रेमींनी यांच्यासह महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी अनेकांनी हजेरी लावली. तसेच कुस्ती प्रेमी याची देखील चांगलीच गर्दी बघावयास मिळाली. या कुस्ती स्पर्धेत ३०० रुपये पासून ते दोन लाख रुपये पर्यंत कुस्त्या पार पडल्या.पंच म्हणून पहिलवान संदीप निकम,शिवाजी काकड,भरत काकड ,माणिक गायकवाड ,किरण थेटे, रामकिसन लभडे आदींनी काम बघितले. कुस्ती स्पर्धेचे समालोचन कोल्हापूर येथील पहिलवान धनंजय मदने यांनी केले.