महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय विभागाच्या मुलाखती पुढे ढकलल्या…!

लाल दिवा-मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र आयोगाच्या २३ ऑगस्ट, २०२४ रोजी होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती ३० ऑगस्ट, २०२४ रोजी होणार आहेत.

 

            महाराष्ट्र आयोगातर्फे संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतींचे आयोजन आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर येथील कार्यालयात करण्यात आले होते.

 

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहे. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव (सरळ सेवा – निकाल) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!