पाथर्डीगाव परिसरातून तीन बांगलादेशी नागरिक ताब्यात… ए टी एस ची करवाई…….!

लाल दिवा…..पाथर्डीगाव परिसरातून तीन बांगलादेशी नागरिक व त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकास दहशतवादविरोधी पथक व इंदिरानगर पोलिसांनी रविवारी (दि. १८)अवैधरीत्या पाथर्डी गावात वास्तव्यास असलेली बांग्लादेशी महिला बांगलादेशातील त्यांच्या नातेवाइकांसोबत ‘आयएमओ’ नावाच्या अॅप्लिकेशनचा वापर करत संपर्कात होती, अशी प्रथमदर्शनी माहिती चौकशीत पुढे आली आहे. संशयित शागोर हुसेन मोहंमद अब्दुल मलिक माणिक (२८), मुस्मम्मत शापला खातून (२६), इतिखानम मोहंमद लाएक शेख (२७, सर्व रा. हल्ली काजी मंजील, पाथर्डी, मूळ बांग्लादेश) अशी तिघांची नावे आहेत. तसेच संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२, मूळ रा. वरवंडी, ता. दिंडोरी) असे चौथ्या स्थानिक

 

बेरोजगारीला कंटाळून ओलांडली ‘सीमा’ बेरोजगारीला कंटाळून कोणत्याही मूळ वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय

 

व्यक्तीचे नाव आहे. नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाला खात्रीशीरपणे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रविवारी (१८) पथकाने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक दिनेश शेंडे, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहायक निरीक्षक योगिता जाधव, आशिष लव्हंगळे, गणेश वाघ, हवालदार सुदाम सांगळे, परेश वडकते, युसूफ पठाण, आसिफ तांबोळी यांचा पथकात समावेश होता. तेथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांना गोपनीय माहितीबाबत पथकाने सांगितले. शरमाळे यांनी काही स्थानिक पोलिसांना या पथकासोबत जाण्यास सांगितले

 पकडले आहे. चौघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 

तीन बांगलादेशी अवैधरीत्या राहत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी पथकासोबत

 

सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. सखोल तपासात एक महिला स्पा सेंटरमध्ये तर एक महिला ब्युटीपार्लरमध्ये काम करत असल्याचे आढळून आले. तर पुरुष घरातच राहत असल्याचे समोर आले. या तिघांनाही शहरात राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्यासाठी एका स्थानिक नागरिकाने मदत केल्याचे उघड झाले. तिघांसह त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीविरोधात इंदिरानगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!