महाराष्ट्र मराठी सामाजिक संघटना आणि आॕल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्नीशियन अँन्ड आर्टिस्ट युनियनचा भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर भिमरत्न पुरस्कार अनिल पगारे यांना जाहिर..!
लाल दिवा -चाळीसगाव,दि.४ : महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ आणि आॕल इंडीया फिल्म प्रोड्योसर टेक्निशियन अँन्ड आर्टिस्ट युनियन यांच्या तर्फे लेखक,साहित्यिक ,शिक्षक ,कलावंत,गायक,पञकार,डाॕक्टर,सामाजिक कार्यकर्ते, आणि उद्योजक आणि विविध क्षेत्रांत अष्टपैलु कार्य करणाऱ्या व्यक्तीना भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर भिमरत्न राष्ट्रीय पुरस्काराने मुंबई येथे दिला जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली असुन या मुंबई येथे गौरवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र मराठी सामाजिक संघटना आणि आॕल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्नीशियन अँन्ड आर्टिस्ट युनियनचे अध्यक्ष दिपक काळींगण व सचिव संदिप पाटिल यांनी पञान्वये कळविले आहे.
- या अनूषंगाने सामाजिक क्षेत्रातील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर भिमरत्न पुरस्कार 2023 हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तळेगाव येथील अनिल पगारे यांना अंधस्रध्दा,स्त्री पुरुष समानता,व्यसनमुक्ती,आरोग्य,संविधान जनजागृती,शिक्षण,स्वच्छता तसेच मागासवर्गियांना शासकीय योजनांची माहिती आदिबाबत जनजागृतीचे कार्यक्रम सन 2006 पासुन लोकसहभागातुन राबवित आहे.जिल्ह्यातील तळेगाव येथील अनिल पगारे यांना सामाजिक कार्याची व समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ भावनेचा कर्तृत्वाचा सन्मान म्हणून पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.सदर पुरस्कार मा.ना.रामदासजी आठवले-(सामाजिक न्याय व आधिकारिता मंञी भारत सरकार),मा.शेखरजी मुंदडा-(अध्यक्ष गोसेवा आयोग महाराष्ट्र ),मा.अविनाश महातेकर -(माजी राज्यमंञी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)व सिनेकलावंत आणि मान्यवरांच्या हस्ते शनिवार दिनांक ७/१०/२०२३ रोजी सायंकाळी ५वाजता कस्तुरबा महिला मंडळाच्या हाॕल माटुंगा,मुंबई येथे पार पडणार आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1