खा. हेमंत (आप्पा) गोडसे यांना मिळणार शिवसेनेकडून उमेदवारी ….. खा. श्रीकांत शिंदे यांनी केली नाशिक लोकसभा उमेदवारीची घोषणा….. गोडसे समर्थकांमध्ये एकच जल्लोष… तर भाजपा पक्षाकडून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांची घोर निराशा…..!

लाल दिवा-नाशिक,ता.१३ :- शिवसेनेच्या वतीने नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे.

 

नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचे आहे. ते असे बोलताच कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा बाजी करत एक प्रकारे आनंदोत्सव केला. तेव्हा दुसरे कोणाचे नाव नसल्याचे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले. महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणायचे आहे आणि त्यात गोडसे पण असतील, असेही ते म्हणाले.

 

यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, या मेळाव्याला चार वाजेपासून लोक आले आहेत. मला यायला उशीर झालाय. हेमंत आप्पा तुमचा धनुष्यबाणच नाशिकला राहणार आहे. हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवायचे आहे. आप्पांनी चांगली कामे केली, जनसंपर्क वाढवला, लोकांची प्रश्न सोडवली असे गौरवोद्गार त्यांनी गोडसेंबाबत काढले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!