लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात : चंदन पवार, राज्य मिडिया प्रमूख, आप (महाराष्ट्र)… !

लाल दिवा-नाशिक,१३ : निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभेच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वर घ्याव्यात याची आम आदमी पार्टीतर्फे राज्य मिडिया प्रमुख चंदन पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडे मागणी केलेली आहे. यासाठी त्यांनी तीन वेळा आयोगाला स्मरणपत्रे देवूनही आयोगाने माझ्या मागणी पत्राचे उत्तर दिलेले नाही असे पवार यांनी सांगितले आहे.

 

आज संपूर्ण भारतात ईव्हीएम विषयी शंका घेतली जाते, अनेक पक्षाच्या लोकांना आणि जनतेला ईव्हीएम विषयी नेहमीच संभ्रम राहिलेला आहे. ती शंका दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन जिल्ह्याच्या ठिकाणी प्रात्यक्षिक बघण्यासाठी आणि मशीन कशाप्रकारे चालते त्याची कार्यप्रणाली जनतेसाठी व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोगाकडून खुली केली जाते, ते प्रात्यक्षिक बघितल्यानंतर ईव्हीएम हॅक केले जावू शकते किंवा नाही, त्यात बाहेरील सॉफ्टवेअरद्वारे बदल केले जाऊच शकत नाहीत हे सांगणे खूप अवघड आहे, म्हणजेच ईव्हीएम विषयी शांशकता संपत नाही.

 

आज ईव्हीएम विषयी अनेक राजकीय पक्षांसहीत सामान्य जनतेलासुद्धा अनेक प्रश्न पडलेले आहेत, त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दोन मागण्या केलेल्या आहेत, जर आयोगाने पवार यांनी सांगितलेल्या पद्धतीने संपूर्ण मतदान यंत्रणा हाताळली तर सर्वांच्या प्रश्नांचे नक्कीच उत्तर मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

 

भारतीय निवडणुक आयोग संपूर्ण देशाला मतदान कसे निपक्षपाती आणि कुठलेही षडयंत्र न करता पार पाडले जाते हे देशाला दाखवुन देवू शकतात, लोकशाहीत संभ्रम मुक्त मतदान करता येऊ शकते आणि जनतेने केलेले मतदान हे त्याच उमेदवाराला जात आहे याची कुठलीही शंका सामान्य माणसांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये राहणार नाही याची आयोग खात्री देवू शकतात. त्यासाठी आयोगाने योग्य पद्धतीने निवडणूक यंत्रणा हाताळली पाहिजे.

 

आज एक सामान्य मतदाता जेंव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जात असतो, त्यावेळेस तो त्याला आवडणाऱ्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबतो, त्यानंतर काही सेकंदात दुसऱ्या मशीन मधून त्याने ज्या उमेदवाराला मतदान केलेले असते त्याची माहिती असलेली एक स्लिप बाहेर पडते, त्या स्लिपवरून त्याने ज्या उमेदवाराला मतदान केलेले आहे त्याच उमेदवाराला आपले मत गेलेले आहे हे समजून तो निश्चित होतोच असे नाही, म्हणजे मतदाराचा संभ्रम येथेही संपत नाही.

 

आज मतदाराला आश्वासक करण्याची मोठी जबाबदारी निवडणुक आयोगावर येवून ठेपलेली आहे, त्यासाठी पवार यांनी निवडणूक आयोगाला दोन मार्ग सुचाविले आहेत.

 

1. मतदान हे बॅलेट पेपरवर घ्यावे आणि ती मत पत्रिका लोकांद्वारे मतदान पेटीत टाकण्यात यावी, जी प्रक्रिया निवडणूक आयोग ईव्हींएम येण्यापूर्वी वापरीत होता.

 

2. ईव्हींएम मशीन मधून जी स्लिप मतदाराला भेटत असते, तीच स्लिप मतदाराने मतदान पेटीत टाकण्याची प्रक्रिया राबवावी.

 

म्हणजे ईव्हींएम मशीन मधुन आज ज्या दोन मतदान स्लिप निघतात, त्यापैकी एक स्लिप मतदार घेऊन जातो आणि दुसरी स्लिप मशीनमध्ये राहते, मशीनमध्ये राहणारी स्लीप बघण्याची कुठलीही सोय नसल्यामुळेच आज लोकांमध्ये शांशंकता निर्माण झालेली आहे. पॉईंट नंबर दोन मध्ये मागणी केलेली प्रक्रिया जर निवडणुक आयोगाने राबवली तर मतदान करणाऱ्यालाही निवडणूक प्रक्रियेवर विश्वास निर्माण होईल आणि पारदर्शकता सुद्धा सिद्ध करता येईल. त्यामुळें कुणाच्याही मनात मतदान यंत्राविषयी संशय बाळगण्याची जराही शक्यता नसेल,मतदाराने ज्या व्यक्तीला मतदान केले आहे, त्याच उमेदवाराला आपले मत जाणार आहे याची खात्री आणि विश्वास त्या मतदाराला होईल आणि असे केल्यामुळे लोकांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये जो ईव्हीएम विषयी आज संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर होण्यास निश्चितच मदत होईल.

 

आज अमेरिका, जपान, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, अर्जेंटिना, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, नार्वे, मलेशिया, स्वीडन, स्पेन, झिम्बाम्बे यासारखे प्रगती झालेले देश सुद्धा आणि विशेष म्हणजे पाकिस्तान सारखा देश सुद्धा आज बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो, तर मग निवडणूक आयोग का घेत नाहीत याचे उत्तर आजही अनुरुत्तीत आहे.

 

*चंदन पवार:-* महाराष्ट्रातील जनतेला लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे मी केलेल्या दोन पैकी एक जरी मागणी मतदान प्रक्रियेत घेतली तरी, जनता नक्कीच मतदान करण्यासाठीं प्रेरीत होईल आणि त्यांचा निवडणुक प्रक्रियेवर विश्वास निर्माण होईल, आज जवळपास सर्वच राज्यांमध्ये फक्त 60 ते 65 टक्केच मतदान होते, याचे कारण म्हणजे लोकांचा ईव्हीएम वरील अविश्वास होय, जर मी सुचविलेली मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली तर मतदानाच्या टक्केवारीत सुद्धा वाढ होईल, जेणेकरून देश हा उत्साह अधिक आनंदाने साजरा करू शकतो, सोशल इंजिनिअरिंगचां हा पहिला प्रयोग जर महाराष्ट्रात राबविला गेला तर, त्याचे अनुकरण बाकीही राज्य करतील याची मला खात्री आहे असे पवार यांनी म्हटले आहे.

 

संपर्क

– चंदन पवार

राज्य मिडिया प्रमुख 

आम आदमी पार्टी, महाराष्ट्र

Mobile: 9819414137

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!