“कुणा अतिशहाण्या गुणवंताने ‘छगन भुजबळ तुम्ही कधीपासून ओबीसी नेते झाले…… मतदारसंघात आले की तुम्हांला तुमचा माळी समाज दिसतो,”…… अशा प्रकारची सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टला भुजबळ समर्थकांचे सडेतोड उत्तर…!

लाल दिवा-नाशिक,२१ : होय …! छगनराव भुजबळ साहेब यांनी सर्व समाजाला न्याय देवून समता प्रस्थापित केली.

  • काय तर म्हणे मतदार संघात आले का फक्त तुम्हाला तुमचा समाज माळी च दिसतो….!
  • मग सांगा मतदारसंघात तयार करण्यात आलेले रस्ते फक्त माळ्याच्याच गावाला जातात का? बंधाऱ्यातील पाणी फक्त माळ्याच्याच शेताला जाते का?
  • भुजबळ साहेबांनी काम घेवून आलेल्यांचा कधीही जात पात धर्म पाहिला नाही. मतदारसंघात तुम्हांला माळी समाज दिसतो असे म्हणणे यावरून तुम्ही जातीचे विष किती भिनवत आहात हे यावरून दिसून येते.
  • तुमचे स्विय सहायक माळी-अरे दांभिकांनो एखाद दुसरा माळी स्विय सहायक असला तर तुमचा एवढा पोटसूळ उठला का.
  • येवल्यात बाळासाहेब लोखंडेसोबत भगवान लोंढे (लोंढे नाना) हे मराठा दिसत नाही का तुम्हाला.

महेश पैठणकर दिसले आणि भुजबळांकडे फक्त पैठणकर,गायकवाड,रवी सोनवणे, बनकर हेच स्विय सहायक नाही तर श्री अक्षय कबाडी हे ९६ कुलीन मराठा आहे.* डॉ.अरविंद नरसिकर – ब्राम्हण, श्रीहरी पुरी-भटके विमुक्त, उदयसिंग राजपूत-भटके विमुक्त हे सुद्धा स्विय अधिकारी आहे. महेंद्र पवार? महेंद्र बोरसे कोण? संदीप बेडसे कोण? बबन गायकवाड कोण? ही नावे सोयीस्कर आठवत नाही की आठवली नाहीत ? 

  •  आणि गायकवाड हे माळी नाहीत. ते दलित समाजाचे आहे. परंतु हे विविध जाती धर्माचे लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकता. कारण भुजबळ साहेब जातीयवादी नाही. असे कोणते मंत्री आहे की त्यांच्याकडे १/२ सुद्धा त्यांच्या जातीचे पी.ए नाही.

कॉन्टक्टर लाईनमध्ये पण माळी म्हणणाऱ्या अतिशहान्याला संभाजी पवार,अंबादास बनकर, वसंत पवार, मोहन शेलार, विठ्ठलराव आठ्शेरे,नारायण आठशेरे,सचिन आठशेरे ,अविनाश गाडे, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड,सुनील ठोंबरे, अण्णा दौडे , शाम बावचे,पी के काळे ,एल टी पवार,सनी पवार ,विलास काटे,मुन्ना पाटील,प्रणव पाटील,तेजस येवले,रमेश दौंडे,अमोल येवले,मनोज रंधे,सचिन देशमुख,साईनाथ शिंदे,डी पी मोरे,विजुनाना खोकले ,,संतोष दौंडे,रायभान उगले,नितिन गायकवाड, उद्धव निकम, पंकज पाटिल, बाबुराव सोमासे, बाळासाहेब दाणे,नाना भड, संतोष आहेर इत्यादी यांची जात माहित नसावी का ? ठेकेदारांची यादी चाळा, त्यात माळी किती आहेत शोधा.

  • तहसील कचेरीत जावून २००४ नंतरच्या मालमत्तेचे उतारे शोधा. कुणाचा उद्धार झाला ते कळेल.मतदारसंघात ठेकेदार माळी तर मग येथील डांबर ,खडी क्रेशर संच कोणाचे ? मजूर सोसायट्या कुणाच्या याची माहिती घ्या, या सर्व गर्दीत कुठे आहे माळी ? 

साहेबांच्या जातीच्या एखाद दुसऱ्या माळ्याने मतदारसंघात नोकरी करू नये का ? कि वडिलोपार्जीत असलेले उद्योग-ठेकेदारी करू नये.

तर मग जरा इतिहासाची पाने चाळा नांदगांव मतदारसंघात बबी कवडे – मराठा, अरुण पाटील – तेली, शिवाजी पाटील – धनगर तर मनमाड नगरपालिकेत बबलू पाटिल – मराठा, सौ पद्मावती धात्राक,गणेश धात्रक वंजारी, राजाभाऊ अहिरे राजेंद्र पगारे दलित,साईनाथ गिडगे धनगर तर मनमाड कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये ओबीसी कुणबी दाखल्यावर निवडून आलेले संजय पवार मराठा तर नांदगांव बाजार समितीत तेज कवडे या मराठा नेत्यांसह सर्व जातीच्या नेत्यांना संधी दिलीच ना.

म्हणे कुठे आहे मराठा, वंजारी, धनगर, तेली समाज. 

सर्वसामान्य घरातील गरीब कुटुंबातील जयंत जाधव या मराठा मुलाला भुजबळांमुळेच दोनदा विधानपरिषदेची पायरी चढता आली ना.

  • जिल्हा परिषद अध्यक्षपदाची वेळ आली तेव्हा कुणबी असलेल्या म्हैसधुनेंना डावलून म्हणे राधाकिसन सोनवणेंना अध्यक्ष केले. राधाकिसन सोनवणे तसेच दलीत असलेल्या मायावतीताई पगारे यांना मतदारसंघाच्या विकासासाठी संधी मिळाली.

विजयश्री चुंभळे, बाळासाहेब क्षिरसागर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करतांना भुजबळांनी जात पाहीली का ?

  •  संजय बनकर,अलका उदय जाधव इत्यादी कुणबी दाखल्यांवर निवडून आलेल्या मराठा बांधवांना भुजबळांमुळेच कृषी सभापती, बांधकाम सभापती होता आले ना?

अति अल्पसंख्यांक असलेल्या मारवाडी समाजाच्या महेंद्र काले यांना तसेच,मराठा समाजातील शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब गुंड यांना जिल्हा परिषद नियोजन समितीत काम करण्याची तर संजय बनकर यांना जिल्हा परिषद सभापती पदावर संधी दिली हे का दिसत नाही.

येवला नगराध्यक्ष पदावर क्षत्रिय समाजाच्या राजश्री पहिलवान,तेली समाजाच्या जयाताई जाधव,गुजराथी समाजाचे निलेश पटेल गुजराथी, मुस्लिम समाजाच्या शबाना शेख, मारवाडी समाजाचे पंकज पारख, माळी समाजाचे प्रदीप सोनवणे यांना तर उपनगराध्यक्ष पदावर मराठा समाजाच्या भारती येवले, मागासवर्गीय समाजाच्या भारती जगताप,मुस्लिम समाजाचे मतीन अन्सारी,परदेशी समाजाचे संतोष परदेशी यांना दिलेली संधी समतावादी वाटली नाही का? येवल्यात काय प्रदीप सोनवणे (माळी) हा एकटाच नगराध्यक्ष झाला का ? २९ वर्षात एक टर्म माळी नगराध्यक्ष झाला तरी तुमच्या पोटात एवढा पोटसूळ उठतो का ?

येवला पंचायत समितीच्या सभापती पदावर मराठा समाजाच्या संभाजी पवार, सयाराम वावधने ,शिवांगीताई पवार,जयश्रीताई बावचे यांना तर धनगर समाजाच्या आशाताई साळवे, दलित समाजाचे प्रकाश वाघ,माळी समाजाच्या राधिका कळमकर ,तर उपसभापती पदावर आदिवासी मच्छिंद्र मोरे, भारती ताई सोनवणे,मराठा समाजाचे पुंडलिक कदम,हरिभाऊ जगताप ,वंजारी समाजाचे पोपटराव आव्हाड यांना दिलेली संधी समन्यायी वाटली नाही का? महेश पैठणकर सारखे सर्व समावेशक आणि शांत जातीचा कुठलाही लवलेश नसणारा चारित्र्यसंपन्न व्यक्ती. माजी आमदार मारुतराव पवारांचा रोष पत्करुन वडार समाजाच्या गोरख शिंदे यांच्या पाठीमागे मजूर फेडरेशन निवडणुकीत उभे राहिले. मजूर फेडरेशन निवडणुकीत संभाजी पवारांना पाच वर्ष,वडार समाजाच्या गोरख शिंदे यांना पाच वर्ष अन् सविता धनवटे यांना एक संधी दिली तर लगेच जातीयवाद झाला का?

  • मुंबई बाजार समितीवर जयदत्त होळकर यांना मिळालेली संधी नाही दिसली का?

बाजार समितीच्या सभापती पदावर मराठा समाजाच्या ताईंना वर्षानुवर्षे तर किसनराव धनगे, धनगर समाजाच्या सुधीर जाधव यांना तर उपसभापती पदावर गणपत कांदळकर यांना संधी मिळाली हे पण नाही दिसत का?

ही उपकाराची भाषा नाही, जबाबदारी मिळालेले कार्यकर्ते देखील त्या पदास पात्र होते, त्यांचे योगदान असल्यानेच त्यांना ही संधी मिळू शकली. 

  • परंतु समाज माध्यमातून वारंवार चुकीच्या माहिती चा उल्लेख करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,म्हणून हा लेखाजोखा मांडावा लागला.

भुजबळ साहेबांच्या कारकीर्दीत सर्व सामान्य कार्यकर्त्याला पद,प्रतिष्ठा च्या माध्यमातून न्याय मिळाला जो यापूर्वी कधी मिळाला नाही आणि भविष्यात कधी मिळणार ही नाही हे मात्र तितकेच खरे. 

होय भुजबळांनी शिवसेना सोडली होती परंतु ती मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या मुद्दयावर. ३५ वर्षांपासून ते ओबीसींचे काम करता आहे. ओबीसींच्या मुद्दयावर ते कधीही तडजोड करू शकणार नाही. येवल्याचे आमदार झाले त्याआधी सुद्धा तर ते ओबीसींचे काम करतच होते ना. मग आजच का तुम्हांला जात आठवली.

  • शिंदे-होळकरांनी मतदारसंघात आणले म्हणजे ते सांगतील तसे निर्णय घ्यायचे ही तर हुकुमशाहीच झाली.

भुजबळ साहेबांनी शरद पवार साहेब या मराठा नेत्याच्या नेतृत्वाखाली काम केले तर अजितदादा या मराठा नेत्यासोबत ते आजही काम करता आहे. जेव्हा शरद पवारांनी कॉंग्रेस सोडली त्यावेळी पवार साहेबांसोबत जायला आधी एकही मराठा नेता तयार नव्हता. तेव्हा सर्वात आधी भुजबळ साहेबांनी कॉंग्रेसमधील मुख्यमंत्री पदाची संधी सोडून पवारांना साथ दिली. आणि तन मन धनाने पवार साहेबांच्या खांदयाला खांदा लावून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करून हा पक्ष वाढवला. पवारांनी भुजबळांना हे पद दिल ते पद दिलं हे खरं आहे पण यामागे भुजबळांचे कष्ट आणि मेहनत होती.

  • तुम्ही जातीसाठी किती खालच्या थराला जाणार याचाही विचार करा. स्वतःच्या मनाला विचारा, आपण किती खोटे प्रचार करतो आहे. आपण उच्च विद्या विभूषित असूनही आपल्या क्षुद्र बुद्धीची किव आल्याशिवाय राहत नाही.

 

राहुल लोणारी संघटक

शिवसेना, येवला शहर

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!