जिल्हा बँकेला उर्जितवस्थेत आणण्यासाठी खा.गोडसे यांचे केंद्रिय सहकारमंत्र्यांना साकडे…!
लाल दिवा, ता. २० : शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू केले आहे. शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक एक वरदान असून आर्थिक वाहिणी आहे. विविध कारणांमुळे बँक अडचणीत आल्याने बँकेकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर्जपुरवठा होत नाही.शेतकरी आणि ठेवीदार यांना दिलासा देण्यासाठी बँकेला गतवैभव पुन्हा प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या आक्षेपामुळे अडचणीत आली ते आक्षेप शिथिल करावेत अशी कळकळीची मागणी वजा साकडे खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रिय सहकार मंत्री नामदार ज्ञानेश कुमार यांना घातले आहे.
जिल्हा बँक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आलेली आहे.त्यामुळे शासनाने जिल्हा सहकारी बँकेवर प्रशासक नेमलेले आहेत.बँक प्रशासनाच्या काही चुका आणि हलगर्जीपणामुळे आज मितीस बँक आर्थिकदृष्ट्या खूपच पिछाडीवर गेलेली आहे.याचा फटका जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना बसतं आहे.