न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य २ डिसेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर…!
लाल दिवा-नाशिक,ता.१ : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. सदर समिती नाशिक विभागाची आढावा बैठक दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी.11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे ,असे उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठक संपल्यानंतर दु.2 ते 3 शासकीय विश्रामगृह येथे सदर समिती राखीव व रात्री मुक्कामी असणार आहे. 3 डिसेंबर रोजी दुपारुन सोयीनुसार मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1