पालकमंत्री भुसेंकडून गोदा घाटाची पाहणी; पानवेली तातडीने काढण्याच्या सूचना
लाल दिवा-नाशिक,ता.१६ :- शहराचे सौंदर्य असलेल्या गोदा घाटावर नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी भेट देत स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी समबंधित यंत्रणेला गोदा घाटावर असलेल्या पान वेली तातडीने काढण्याच्या सूचना केल्यात. मंत्री भुसे यांनी रामवाडी पुल येथील गोदा पार्क परिसरात पाहणी केली. स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली.
22 जानेवारी रोजी अयोध्येत श्री रामाची प्राण प्रतिष्ठा होत असून याच धर्तीवर नाशिक शहरातील गोदा घाट देखील सजवला जाणार आहे. 24 जानेवारी रोजी राम कुंड तसेच परिसरात भाविकांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्वोतोपरी यंत्रणा राबविण्याच्या सूचना केल्यात.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी सुमंत मोरे, श्रीकांत पवार उपायुक्त मनपा नाशिक, विजयकुमार मुंडे उपायुक्त मुंडे हे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.