नाशिकमध्ये भरधाव पिकअपने घातला थरार; कर्तव्यावरुन परतणाऱ्या पोलिसांना उडवले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

लाल दिवा-नाशिक,दि.२०: शहरातील मातोरी रोडवरील मखमलाबाद येथे काल रात्री एका भीषण अपघाताने परिसरात हळहळ पसरली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा पिकअपने समोरून येणाऱ्या मारुती ८०० कारला जोरदार धडक दिली. ही कार नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल घेऊन परतत होती. अपघातात कॉन्स्टेबल रमेश पांडुरंग अवतार यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रविण मनोहर दोबाडे हे गंभीर जखमी झाले. 

अपघात एवढा भीषण होता की मारुती कारचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती देताना म्हसरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (डहाके) यांनी सांगितले की, काल रात्री साडेनऊच्या सुमारास रमेश अवतार आणि प्रविण दोबाडे हे नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथून कर्तव्यावरुन परतत होते. जय मल्हार हॉटेल समोरून जाताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा पिकअपने (क्र. एम एच. १५ एच. एच. ४८३०) त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. अपघात घडवून पिकअप चालक घटनास्थळावरून पळून गेला. 

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी रमेश अवतार यांना मृत घोषित केले. प्रविण दोबाडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, मृत्यूमुखी पडलेले कॉन्स्टेबल रमेश पांडुरंग अवतार यांच्या  जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.  पोलीसांनी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतुकीत काही काळ अडथळा निर्माण झाला होता

 

  •  प्रतिक्रिया पोलीस कॉन्स्टेबल राजू काकड

 

“दहा मिनिटं उशिरा पोहोचलो असतो तर तोही गेला असता…” – प्रत्यक्षदर्शी राजू काकडे यांची ह्रदयद्रावक कहाणी

नाशिक: मातोरी रोडवरील भीषण अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर दुसऱ्या कॉन्स्टेबलचा जीव प्रसंगावधान राखून वाचवण्यात आला. घटनेचे प्रत्यक्षदर्शी राजू काकडे यांनी ही धाडसी कहाणी सांगितली. 

“मी कामावरून घरी परतत होतो. समोरच जय मल्हार हॉटेलजवळ हा भीषण अपघात झालेला पाहिला. एका पिकअपने मारुती कारला जोरदार धडक दिली होती. मी तात्काळ घटनास्थळी धावलो. कारमध्ये दोघे जण अडकले होते. त्यांना गंभीर दुखापत झाली होती. मी तात्काळ त्यांना बाहेर काढले आणि माझ्या गाडीने रुग्णालयात नेले. एकाचा जीव वाचवण्यात यश आले, पण दुसऱ्याला वाचवता आले नाही, याचे फार वाईट वाटते. डॉक्टरांनी सांगितले की, दहा मिनिटं उशिरा आलो असतो तर तोही गेला असता.” असे सांगताना राजू काकडे यांचा कंठ दाटून आला. 

दरम्यान, या अपघातात दुसऱ्या जखमी पोलिसाचा जीव वाचल्याने सर्वांनीच देवाचे आभार मानले आहेत. पण एका सहकाऱ्याला कामावरुन कायमचे गमवावे लागल्याने शोककळा पसरली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!