नाशिक शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट…… भद्रकाली, अंबड, सातपूर, इंदिरानगर पाठोपाठ सिडकोतील मटका व्यवसायावर पोलिसांचा छापा…..!

लाल दिवा : गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलीस विशेष शाखे द्वारे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात रेड पाडली जात आहे. नुकतेच इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एका स्पा सेंटरवर छापा टाकून तेथील वेश्याव्यवसाय उघडकीस आणला होता. त्यानंतर अंबड पोलिसांनी सावता नगर येथील दिव्या ॲडलॅब खाली सुरू असलेला मटक्याचा व्यवसाय उघडकीस आणल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दिव्या अॅडलॅब सिनेमागृहाच्या पार्किंगच्या आडोशाला, सावतानगर येथे रोख रक्कम व एक आकडे लिहीलेली डायरी. आरोपी हे फायदयासाठी मटका नावाचा जुगार लोकांकडुन पैसे लावुन घेवुन खेळवीत होते. म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह अंबड पोस्टे, गुरनं 149/2024 महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 12 (अ) प्रमाणे तुशार उध्दव मोरे, वय-28 वर्षे, रा- एन. 41, व्हि.सी. अष्टविनायक चौक, सावता नगर, सिडको नाशिक. दौलत राधाकिसन जाधव, वय-45 वर्षे, रा. साईबाबा नगर, सिडको, नाशिक., देवेंद्र सिताराम सांळुके, वय 45 वर्षे, रा. बजरंग चौक, सावता नगर, सिडको, नाशिक. प्रविण छबु तांबळे, वय 39 वर्षे, रा. मोती चौक, श्रीराम नगर, सिडको, नाशिक. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!