तत्कालीन पोलीस अधीक्षकांसह अन्य पोलीस….! अधिकाऱ्यांना मानवाधिकार आयोगाची नोटीस….!

लाल दिवा -नाशिक,ता.१८ : नोटिशीचा आशय पुढील प्रमाणे, तत्कालीन पोलीस अधीक्षक धुळे साहेबराव पाटील, तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव व आझादनगर पोलीस स्टेशन धुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेशसिंग पी. परदेशी, तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री. ढोले व पोलीस स्टेशन येथील संबंधित पोलीस कर्मचारी यांचे विरुद्ध दीपककुमार प्यारेलाल गुप्ता, रा. ३८८, घरकुल, शिवाजी नगर, जळगाव, ता. जि. जळगाव यांनी मा. राज्य मानवअधिकार आयोग, मुंबई येथे तक्रार अर्ज क्र. KKT/Case No. ५२४५/२०१५ अशी दाखल केलेली असून, सदर तक्रार अर्जाचे अनुषंगाने मा. अध्यक्ष सो. राज्य मानवअधिकार आयोग, मुंबई यांनी ३०/१०/२०२३ रोजी आदेश पारित करून आपणास दिनांक २०/१२/२०२३ रोजी व्यक्तीशः हजर राहून खुलासा सादर करणे कामी आदेशित करण्यात आलेले आहे. तशी नोटीस हि आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळावर (ई-मेल) देखील पाठवण्यात आलेली असून तक्रारदार यांना देखील व्यक्तीशः आपणास सूचित करणे बाबत मा. अध्यक्ष सो. राज्य मानवअधिकार आयोग, मुंबई यांनी आदेशित केलेले आहे. सोबत मा. अध्यक्ष सो. राज्य मानवअधिकार आयोग, मुंबई यांनी दिनांक ३०/१०/२०२३ रोजी केलेल्या आदेशाची प्रत व आवश्यक दस्तऐवज (एकूण पाने २४ ) सोबत जोडलेले आहेत.

तरी मा. अध्यक्ष सो. राज्य मानवअधिकार आयोग, मुंबई यांनी दिनांक ३०/१०/२०२३ रोजी केलेल्या आदेशाप्रमाणे आपण दिनांक २०/१२/२०२३ रोजी व्यक्तीश: हजर होवून खुलासा दाखल करणे करणेबाबत आपणास सूचित करण्यात येत आहे..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!