हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: पोलीसांनी टाकला सापळा, जाफर मन्सूरसह महिला अटकेत!*

  • रहस्यमय इमारतीत लपले होते सेक्स रॅकेट, पोलिसांनी केला थरारक छापा!

लाल दिवा नाशिक,दि,५:– शहरातील आडगाव येथे पोलीसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा मारत दोन मुलींची सुटका केली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातून अनैतिक देहव्यापार उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. 

या मोहिमेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कपालेश्वर नगर येथील निर्माण नक्षत्र बिल्डिंगमध्ये कारवाई केली. यावेळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. 

या कारवाईत अनैतिक देहव्यापार चालवणाऱ्या एका महिलेसह जाफर मन्सूर नावाच्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन मुलींना सुटका करण्यात आली. सदर मुलींना मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक कामांसाठी जबरदस्तीने ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

पोलिसांनी आरोपीविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आडगाव पोलीस करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पीसीबी एमओबी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सपोनि विश्वास चव्हाणके, पोउनि पंडित अहिरे, मपोउनि वैशाली भाबड, सपोउनि नामदेव सोनवणे, पोहवा शेरखान पठाण, पोहवा गणेश वाघ, पोहवा समीर चंद्रमोरे, पोअंम प्रजित ठाकुर, मपोना मनिषा जाधव, मपोशि वैशाली घरंटे, मपोशि लता सुरसाळवे, मपोशि स्नेहल सोनवणे, चालक सपोउनि विजय रायते यांच्या पथकाने सहभाग घेतला.

What’s your Reaction?
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!