बातमी: मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलाचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल’ !

मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलाचे नाव अता ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल’ देण्यात आले 

लाल दिवा-मुंबई (दि. 05) -नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काष्टी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान संकुलाचे नाव  ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल’ देण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हा निर्णय घेतला आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी या संकुलाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करण्याची विनंती मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या आणि कृषिमंत्री मुंडे यांनी तात्काळ निर्णय घेत हा बदल केला. 

दरवर्षी सुमारे 320 विद्यार्थी या संकुलात प्रवेश घेतात आणि चार वर्षांत बाराशे पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देण्यात आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात हे संकुल महत्वाची भूमिका बजावते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या संकुलास दिल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!