हृदयद्रावक! नाशिकमध्ये हैवानतीचा कळस, संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप, समाजात संतापाची लाट
महिलांचे गुरुमाऊलींनी केले लैंगिक शोषण……. खोट्या आरोपाखाली निंबा शिरसाठ नावाचे बनावट प्रकरण उभे करून… केले खंडणीचे खोटे आरोप : संभाजी ब्रिगेड
लाल दिवा-नाशिक,द.१८:-नाशिक (प्रतिनिधी):** नाशिक शहरात एका अत्यंत धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून समाजात संतापाची लाट पसरली आहे. संभाजी ब्रिगेडने आज येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन गुरुमाऊली यांच्यावर अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक आरोप केले आहेत.
ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार, मागील महिन्याच्या १५ आणि १६ तारखेला वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे हे गुरुमाऊलींसोबत होते. तसेच, मागील वर्षी घडलेल्या सारिका बाबुराव सोनवणे प्रकरणात गुरुमाऊलींनी तिचे लैंगिक शोषण केले आणि खोट्या आरोपाखाली निंबा शिरसाठ नावाचे बनावट प्रकरण उभे करून तिच्यावर खंडणीचे खोटे आरोप लावले. सारिका सोनवणे यांनी ब्रिगेडला दिलेली कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली. ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असून याबाबत प्रसारमाध्यमांनी सखोल तपास करून प्रकाश टाकण्याचे आवाहन ब्रिगेडने केले आहे.
ब्रिगेडने वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे गुरुमाऊलींशी थेट संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेचे ब्रिगेडने जोरदार समर्थन केले आहे. सारिका सोनवणे यांना निलंबित करण्यात धनंजय मुंडे यांचा थेट हातभार असल्याचा आरोपही ब्रिगेडने केला असून, सोनवणे या कृषी सहाय्यक असताना धनंजय मुंडे हे कृषिमंत्री होते. सध्या सोनवणे बेपत्ता असून, पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी तातडीने त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी ब्रिगेडने केली आहे.
संतष देशमुख यांची हत्या कराडच्या साथीदारांनी केल्याचा धक्कादायक आरोपही ब्रिगेडने केला असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सुरेश धस आणि तृप्ती देसाई यांच्या भूमिकेचे ब्रिगेडने समर्थन केले असून, गुरुमाऊलींवरील सर्व आरोप १००% खरे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी सारिका सोनवणे यांनी ब्रिगेडशी संपर्क साधला होता आणि सर्व घटनाक्रम सांगितला होता. त्यांनी काही महत्वाची कागदपत्रेही ब्रिगेडला दिली होती. पंचवटी पोलीस स्टेशनचे पीआय अनिल शिंदे यांच्याकडे तक्रार नोंदवूनही २४ तासांत गुन्हा दाखल झाला नाही, यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विष्णू चाटे, वाल्मीक कराड, कृष्ण आंधळे आणि धनंजय मुंडे यांचे तात्काळ राजीनामे घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ब्रिगेडने केली आहे. ही घटना निश्चितच संतापजनक असून, यामुळे संपूर्ण समाज हादरला आहे