गुंगीकारक औषध देवून लुटणारी महीला व तीच्या ०४ साथीदारांची टोळी जेरबंद करून ०४ गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई….!

लाल दिवा, ता. २५ : म्हसरूळ पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे फिर्यादी बापू किसन सुर्यवंशी रा. सावतानगर सिडको, नाशिक यांनी तक्रार दिली की, दिनांक १२/०५/२०२३ रोजी २०.३० चे सुमारास एका अनोळखी महिलेने मला फोन करून सुरत येथे जायचे आहे असे सांगुन हॉटेल सायबाचे पुढे अमृततुल्य दुकाना समोर दिंडोरीरोड, नाशिक येथे माझे कार मध्ये बसुन वणी येथे सदर महिलेचा अनोळखी मित्र कार मध्ये बसवुन घेवुन मला देवीचा प्रसाद म्हणुन गुंगीचे औषध टाकलेला पैदा खायला दिला व त्यानंतर मी बेशुद्ध झालेनंतर माझी कार व अंगावरील सोन्याचे दागीने व पाकीट असा एकूण १,९१,०००/- रुपये किंमतीचा माल चोरुन घेवुन पळुन गेले होते. यावरून म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. I १०२ / २०२३.भा.द.वि. कलम ३२८, ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दिनांक १९/०५/२०२३ रोजी दाखल झाला होता.

गुन्हे शाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना तांत्रिक माहिती व सि. सि. टी. व्ही. फुटेज च्या आधारे म्हसरूळ पोलीस स्टेशन ला दाखल गुन्हयात सहभागी असणारा आरोपी निलेश राजगीरे यास प्रथम निष्पन्न केला. त्याचा शोध घेवुन त्यास दि. २२/०५/२०२३ रोजी ताब्यात घेवुन त्याचे कडे अधिक तपास करता सदर गुन्हयात मुख्य सहभाग असणारी महीला व मुख्य आरोपी दिनेश विजय कबाडे तसेच त्यांचे साथीदार किरण वाघचौरे व मनोज पाटील यांनी सदरचा गुन्हा केल्यावे निष्पन्न झाले. अधिक तपास करून आरोपी किरण वाघचौरे व मनोज पाटील यांना ताब्यात घेतले, त्यानंतर मुख्य आरोपी दिनेश विजय कबाडे हयास सापळा रचुन दि. २२/०५/२०२३ रोजी जेलरोड भागातून स्विप्ट कार कक्र. एम एच १९ वी यु ६५८५ सह ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे ताब्यात गुंगीकारक औषधे मिळुन आली. सदर आरोपी, स्विप्ट कार बाबत तपास करता मुख्य आरोपी दिनेश विजय कवाडे याने त्याची महीला साथीदार यांनी दि. २१/०५/२०२३ रोजी चे रात्री एका अनोळखी इसमास पुन्हा गुंगीकारक औषध देयुग त्याला लुटुन त्याची कार पळविल्याचे सांगीतले. त्यावरून महीला आरापीताचा शोध घेवून तीला दि. २३/०५/२०२३ रोजी सकाळी ताब्यात घेतले. तीचे कडे ही गुंगीकारक औषधे मिळुन आली सदर आरोपीतांना अटक करून दि. २३/०५/२०२३ रोजी मा. न्यायालया समोर हजर केले असता त्यांना दि. २६/०५/२०२३ रोजी पावेतो पोलीस कोटडी रिमांड दिली आहे. पोलीस कोठडी रिमांड दरम्यान सदर आरोपीतांकडे एकत्रीत अधिक तपास करता त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर टोळी कडुन म्हसरूळ पोलीस ठाणेचे गुन्हयातील फिर्यादी यांची सियाज कार क्र. एम. एच ०४ एच एफ ७३९१ व लुटलेले २९ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.

याव्यतिरिक्त आडगाव पो. ठाणे कडील गुरनं १२२/२०२३ भादवि कलम ३२८, ३७९, ३४ या गुन्हयातील १३ ग्रॅम सोणे, घडयाळ व मोबाईल हस्तगत केले आहे. तसेच त्यांचे कडुन स्विप्ट कार क. एम एच १९ बी यु ६५८५, ब्रिझा कार बनावट क. एम एच १५ जी आर ५६३२ हस्तगत केल्या आहेत. असा एकुण १४,८६,५००/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीकडुन

 

(१) म्हसरूळ पोलीस स्टेशन । गु.र.नं. १०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८, ३७९, ३४ प्रमाणे, २) आडगाव पोलीस स्टेशन | गु.र.नं. १२२ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८, ३७९.३४ प्रमाणे, (३) कासा पोलीस ठाणे, पालघर गु.र.नं. ५२ / २०२३ भा.द.वि. कलम ३२८,३९२, ३४ प्रमाणे

 

४) वाकुंज पोलीस ठाणे, औरंगाबाद जु. र. नं. ६८ / २०२३ भादवि कलम ३७९, ३४ असे गुन्हे उघडकीस आलेले आहे. तसेच यातील मुख्य आरोपी दिनेश विजय कवाडे याचे वर कनबा पोलीस ठाणे, अहमदाबाद राज्य गुजरात येथे गु. २.नं. ५०३/२०२३ भा.द.वि. कलम ३०२, १२०५, ११४, ३४ प्रमाणे व किरण एकनाथ वाघचौरे याचे वर सिटी पोलीस ठाणे, श्रीरामपुर येथे गु.र.नं. ११२०/२०२२ भा.द.वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल आहे. वर नमुद आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हेशाखा युनिट ०१ चे पोलीस उप निरीक्षक श्री. चेतन श्रीवंत हे करीत आहे.

 

सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंद रखो, गा, पोलीस उप आयुक्त प्रशांत वा सो. गुन्हे, सा.सहप पोलीस आयुक्त वसंत मोरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सहा. पोनिरीक्षक हेमंत तोडकर, पो.उप निरी. चेतन श्रीवंत, सपोउनि / रविंद्र बागुल, पो. हवा./ प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, धनंजय शिन्दे, विशाल देवरे, विशाल काटे, महेश साळुंके, आप्पासाहेब पानवळ, गुख्तार शेख, सुरेश माळोदे, योगीराज गायकवाड, मनोज डोंगरे, रावजी नगर, चालक सपोउनि / किरण शिरसाद, पो.अ./ समाधान पवार यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!