मालेगावात सराफा दुकानात हातचलाखीने सोने चोरणारी महीलांची टोळी जेरबंद ……किल्ला पोलीसांनी १२ तासात केली गुन्हयाची उकल..!

लाल दिवा- नाशिक, ता. २५ : दिनांक २३/०५/२०२३ रोजी सायंकाळचे सुमारास मालेगाव शहरातील सराफा व्यावसायीक श्री. नटवरलाल शिवरतन वर्मा यांचे मे. वर्मा गोल्ड सराफा दुकानात तीन बुरखाधारी महिलांनी सोन्याच्या फुल्या दाखविण्याच्या बहाण्याने एकुण १५२ ग्रॅम वजनाच्या नाकातील सोन्याच्या फुल्यांचा बॉक्स हातचलाखीने चोरी करून घेवून गेलेबाबत मालेगाव किल्ला पोलीस ठाणेस गुरनं ८१ / २०२३ भादवि कलम ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर चोरीचे गुन्हयाबाबत किल्ला पोलीस ठाण्याचे सपोनि गौतम तायडे व पोउनि ढाकणे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मे. वर्मा गोल्ड सराफा दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरांची पडताळणी करून चोरी करणा-या संशयीत महीलांचे वर्णनावरून, त्या मालेगाव शहरातीलच असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून किल्ला पोलीसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहीती घेवून महीला नामे १) साजेदाबानो उर्फ अन्नु बशीर खान, रा. कुटूंबारोड, मालेगाव, २) ताहेरा उर्फ आशिया खुर्शीद अहमद, रा. ताजपंजन चौक, मालेगाव, ३) नाजीया शेख इस्माईल शेख, रा. कौसिया कॉलनी, मालेगाव यांना वरील गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले. सदर महीलांना महीला पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मदतीने विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांचे कब्जातून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ६१ ग्रॅम वजनाच्या नाकातील सोन्याच्या फुल्या किं.रु. ३,०५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास किल्ला पोलीस ठाण्याचे पोउनि श्री. ढाकणे हे करीत आहे.

  • नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग श्री. प्रदीप कुमार जाधव यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे मालेगाव किल्ला पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. गौतम तायडे, पोउनि ए. एम. ढाकणे, पोहवा पाटील, पोकॉ भोये, निकाळे, भामरे, महीला पोहवा बागुल, मपोना जगताप, पोकॉ मते, आहिरे यांचे पथकाचे १२ तासात सदर गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!