रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीकडून नेशन बिल्डर पुरस्काराचे भव्य वितरण; शिक्षकांच्या कार्याचा दिमाखात गौरव

शिक्षकांच्या हातून घडणारे राष्ट्र: रोटरीचा ‘नेशन बिल्डर’ सन्मान

लाल दिवा-नाशिक,दि.६ :- राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान अमूल्य असून भारतीय संस्कृतीत गुरुंना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान आहे. याच परंपरेचे जतन करत रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीतर्फे दरवर्षी शिक्षकरुपी गुरुजनांना ‘नेशन बिल्डर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा हा भव्य सोहळा हॉटेल करी लिव्हज येथे दिमाखात पार पडला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब नाशिक ग्रेप सिटीच्या अध्यक्षा रेणू पनिकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. ‘नेशन बिल्डर’ पुरस्कारांचे वितरण अध्यक्षा रेणू पनिकर, माजी अध्यक्ष जयंत खैरनार, डॉ. जयेश ढाके, माजी अध्यक्ष अलका सिंग, सदस्य अमित घरटे, रोटे. पद्मिनी सुजाथन, रोटे. मुकुल चतुर्वेदी, रोटे. हरिष सोनवणे, रोटे. शेफाली अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावर्षी जिल्ह्यातील अकरा गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये मीना ठोके (भरवज, इगतपुरी), माधुरी जाधव जामुंडे (इगतपुरी), गीतांजली परदेशी (बानेवाडी, इगतपुरी), कविता जयदीप पाटील (मनपा शाळा 86), लीलाबाई बबन चौरे (मनपा शाळा 86, नाशिक), प्रकाश पाटील (चिंचखेड दिंडोरी), वंदना धर्मा देवरे (आण्णासाहेब वैश्यपायन स्कुल, सातपूर), उमेश राठोड (नांदगाव सदो, इगतपुरी), अश्विनी सुभाष पाटील (सारूळ, नाशिक), वैशाली वाघ (विशेष शिक्षिका, मनपा नाशिक), आणि शीतल आहेर (ज.वि. दिंडोरी) यांचा समावेश होता. 

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्रीराम आहेर यांनी पारदर्शी आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने या अकरा गुणवंत शिक्षकांची निवड केली होती. श्रीराम आहेर यांना माजी अध्यक्ष जयंत खैरनार यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. 

रोटरी क्लबच्या अध्यक्षा रेणू पनिकर यांनी सर्व शिक्षकांच्या अद्वितीय आणि अनुपम कार्याबद्दल कौतुकाची थाप दिली. पुरस्कारार्थी प्रकाश पाटील, वैशाली वाघ आणि कविता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रागिणी भवर यांनी केले तर आभार प्रदर्शन अलका सिंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या सेक्रेटरी जयश्री पाटील, डॉ. जयेश ढाके आणि अमित घरटे यांनी विशेष प्रयत्न केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!