१ लाख ४ हजार रुपयांची लाच घेताना त्र्यंबक येथील ग्रामसेवकास अटक..!
लाल दिवा-नाशिक,ता.३० : अनिलकुमार मनोहर सुपे, वय- ४६ वर्षे, व्यवसाय-नोकरी, ग्रामसेवक, वाढोली , नाशिक १ लाख ४ हजार रुपये लाच स्वीकारली लाचेचे कारण यातील तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी वाढोली,त्र्यंबक ग्रामपंचायत अंतर्गत चे. निलंबिका मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी मर्या.मु.पो.आंबोली ता.त्र्यंबक, जिल्हा- नाशिक चे नावे वाढोली गावचे विविध कामे घेतलेली होती.सदर कामे तक्रारदार यांनी विहित कालावधी मध्ये पुर्ण केलेली असून काही कामाची बिले तक्रारदार यास मिळाली असून २,९९,७७६ या रकमेचे बिल हे वाढोली,ग्रामपंचायत कडून मिळाले नाही. त्याबाबत तक्रारदार हा आलोसे ,ग्रामसेवक सुपे यांच्याकडे बिल बाबत विचारणा करत होता. सदर बिल मंजुर करण्यासाठी ३० हजार रुपये व यापुर्वी तक्रारदार यांनी केलेले कामाचे बिल यापूर्वी मंजूर केलेले आहे त्याचे बक्षीस म्हणुन ७० हजार रुपये, सर्व बिलांचे ऑडिट करण्याचे ४ हजार रुपये असे एकूण १ लाख ४ हजार रुपयांची आलोसे ,ग्रामसेवक सुपे यांनी तक्रारदार यांच्याकडे दि.२९ रोजी मागणी करून दि ३० रोजी रुपये घेताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे त्यांचेवर सरकार वाडा पोलीस स्टेशन ,नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे..
- पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक -पोलीस नाईक संदीप हांडगे ,पोलिस नाईक प्रभाकर गवळी.पोलीस नाईक सुरेश चव्हाण, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक,- मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
- दुरध्वनी क्रमांक- 02532578230 टोल फ्री क्रमांक १०६४ .