ईद-ए-मिलादच्या निमित्ताने राज्यपालांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा !

राज्यपालांकडून ईद-ए-मिलाद निमित्त शुभेच्छा

लाल दिवा-नाशिक मुंबई, दि. १६: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद-ए-मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद-ए-मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करून देतो. 

“ईद-ए-मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!