देशी विदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या वाहनासह ३,९७,०९० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त…..नाशिकरोड पोलीसांची कामगिरी…!
लाल दिवा-नाशिक,२९ : शहरात अवैध धंदयांचे उच्चाटन करणेबाबत मा. पोलीस आयुक्त सो., नाशिक शहर यांचे आदेश असल्याने त्याबाबतची माहिती प्राप्त करून नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके यांनी अधिकारी अंमलदार यांना आदेशित केले होते.
त्यानुसार दि. २८ / १० / २०२३ रोजी सपोनि गणेश शेळके व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हद्दीत गस्त करताना सपोनि / शेळके यांन मिळालेल्या माहितीनुसार सिन्नरफाटा, एकलहरा रोड येथे इको गाडीतून अवैधरित्या दारू वाहतुक होणार आहे याबाबत माहिती मिळाल्याने सदर बाब वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके यांना सांगितली. त्यांच्या आदेशाने सिन्नरफाटा-एकलहरा रोड येथे जावून सपोनि / शेळके तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार, दोन पंच यांचेसह एकलहरा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराजवळ सापळा लावला असता दुपारी ०१/५० वा. चे सुमारास नाशिक-पुणे महामार्गमार्गे एकलहराकडे येणारी सिल्व्हर रंगाचे मारुती सुझुकी कंपनीची इको चारचाकी गाडी क्रमांक एम. एच. १२ जी. आर. ४२७७ हे वाहन थांबवुन त्यावरील वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आनंद पद्मनाभ शेट्टी, वय ५८ वर्षे रा. वास्तु वैभव हाईट्स, प्रशांत नगर, पाथर्डी फाटा, नाशिक असे सांगितले. नमुद गाडीचे दरवाजे पंचासमक्ष उघडुन आत बघितले असता नमुद वाहनामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या देशी व विदेशी दारूचा साठा आढळुन आला या वाहतुकीबाबत चालकास विचारले असता कोणताही वैध परवाना त्याचेकडे मिळून आला नाही. गाडीतील संपुर्ण मुद्देमालाची मोजणी केली असता त्यात एकुण ९७,०९०/- रूपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या मिळून आल्या. तसेच मारुती सुझुकी कंपनीची सिल्व्हर रंगाची इको चारचाकी गाडी क्र. एम.एच. १२ जी. आर. ४२७७ क्रमांक असलेली किंमत ३,००,०००/- रूपये असा एकूण ३,९७,०९०/- रूपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. वरील वर्णनाची व किंमतीची देशी व विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आपले कब्जात बाळगुन वाहनामध्ये अवैधरित्या वाहतुक करतांना आढळुन आल्याने चालकाविरुध्द तसेच वरील दारूचा पुरवठा करणारा इसम यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधि. कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती मोनिका राऊत, मा. सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग, श्री. आनंदा वाघ आणि नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शेळके, गुन्हे शोध पथकाचे पोहवा / १६४८ अखलाक शेख, पोहवा / १८५१ संदीप पवार, पोना / ८७० अनिल पवार, पोशि/ २०४ अरूण गाडेकर, पोशि/ २५५० भाऊसाहेब नागरे, पोशि/ १५४२ यशराज पोतन, पोशि/ २३६० रोहीत शिंदे, पोशि/ २५५० कल्पेश जाधव, पोशि/ २३८१ गोकुळ कासार पोशि/ ५४ नाना पानसरे अशांनी यशस्वीरित्या केलेली आहे.