घराचे खिडकीतुन हात घालुन चोरी करणारे अटट्ल सराईत २ आरोपी जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची कामगिरी….!
लाल दिवा : दिनांक २३/०२/२०२३ रोजी रात्री ०२:१० ते सकाळी ०९.०० वा. दरम्यान फिर्यादी भाउसाहेब चिंधा आहेर रा. प्लॉट नं. १ सप्तशृंगीनगर, जेलरोड, नाशिकरोड हे त्यांचे राहात्या घरी झोपलेले असतांना त्यांचे घराचे बेडरूममधील खिडकीतुन अज्ञात चोरटयाने खिड़की लोटुन खिडकीत हात घालुन ओपो कंपनीचा काळे रंगाचा | एफ-१७ प्रो मोबाईल व १६,५०० रू रोख रूपये असलेले पाकीट असा एकुण १८,५००/- रू. चा माल चोरून नेलेबाबत उपनगर पोलीस ठाणेस गुरनं. ६९ / २०२३ भादविक ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा संमातर तपास करत असतांना दि. ३१/०५/२०२३ रोजी पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांना बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी केलेला मोबाईल फोन विक्रीसाठी दोन इसम | अभियंतानगर कामटवाडे, सिडको येथील एका गार्डनमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. सदरची बातमी मा. वपोनिरी श्री. अंचल मुदगल सो. यांना कळविली. त्यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करून | कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले, त्यावरून पो. हवा / प्रदीप म्हसदे, पो. हवा प्रविण वाघमारे, संदीप भांड, पो.ना / विशाल काठे, प्रशांत मरकड, पो.अं. राहुल पालखेडे, पो. अं. मुख्तार शेख, पो. अं. राजेश राठोड चालक | सपोउनि / किरण शिरसाठ अशांना खात्री करून कारवाई करणेस रवाना केले त्यावरून त्यानी सदर ठिकाणी सापळा लावुन इसम नामे १) विजय तुकाराम वाघमारे वय ४७ वर्षे रा. तुळजा भवानी रो हाउसेस गट नं.७१ (अ) प्लॉट नं. ९/१० दत्तनगर, चुंचाळे, शिवार, नाशिक १० मुळ रा.मु.वेणी पो. लोणार ता. लोणार, जि. बुलढाणा २) सागर संजय गरुड वय २४ वर्षे रा. मारुती संकुल रो हाउस नं. २, दत्तनगर अंबड नाशिक अशांना पकडुन त्यांचे अंगझडतीत ४ मोबाईल फोन मिळुन आले, त्यांना विचारपुस करता त्यांनी सदरचे मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली, | त्यांना पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस करून त्यांचेकडे आणखी संशयीत १२ मोबाईल फोन मिळुन आल्याने ते जप्त करण्यात येवुन, त्यांनी कोठुन चोरी केले आहे, या बाबत अधिक चौकशी करीत आहे. सदर आरोपीताकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
वरील आरोपींकडुन चोरीचे एकुण १६ नग मोबाईल फोन एकुण ९७,०००/- रू किंमतीचे हस्तगत | करण्यात येवुन त्यांचेकडुन १) उपनगर पोलीस स्टेशन गुरनं. ६९ / २०२३ भादविक ३८० २) गुरनं. १७/२०२२ | भादविक ३८० हे दोन गुन्हे उमाळीस आले असुन बाकी इतर मोबाईल फोन कोठुन चोरी केले आहे बाबत शोध घेत आहोत.
सदरची कामगिरी मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे) नाशिक शहर, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त सो. गुन्हेशाखा, नाशिक | शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंचल मुदगल, सपोनि / हॅमत तोडकर, पोउपनिरी / विष्णु उगले, पोउपनि / चेतन श्रीवंत, पो. हवा / प्रदीप म्हसदे, पो. हवा प्रविण वाघमारे, संदीप भांड, पो.ना / विशाल काठे, प्रशांत मरकड पो. अं. राजेश राठोड, पो. अं. राहुल पालखेडे, पो. अं. मुख्तार शेख, चालक | सपोउनि / किरण शिरसाठ अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे.