फोम ची सांगून थर्माकॉलची गादी विकणाऱ्यांचा भांडाफोड ; “ते” लोक बांगलादेशी असल्याचा संशय….!
लाल दिवा -नाशिक,दि.८: सिडको : भाजपा आमदार नितेश राणे यांनी मालेगाव मध्ये बांगलादेशी व रोहिंगे असल्याचा दावा केलेला असताना आता नाशिक मध्ये देखील बांगलादेशी फिरत असल्याचा संशय मनसेने व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरात सध्या काही फेरीवाले हे गाद्या विकत आहेत. त्या गाद्या फोम व स्पंजच्या आहेत. त्यांच्याकडे कुठलेही ओळखपत्र नसून ते उत्तर प्रदेशचे असल्याचे सांगत आहे. ते खोट बोलत आहेत. परंतु ते नक्कीच बांगलादेशी असल्याचा संशय मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांना संशय आला. त्या गाद्या उघडून बघितल्या तर थर्माकोलच्या गाद्या आढळून आल्या. गादी विक्रेतांना आधार कार्ड वैगरे विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र आढळून आले नाही. ते म्हणतात की आम्ही उत्तरप्रदेश चे आहोत. पण आम्हाला संशय आहे कि ते बांग्लादेशी घुसखोर वाटत आहेत. तरी नागरिकांनी सावध राहावे व गादी घेतांना चेक करुन घ्यावे असे आवहन
मनसे पदाधिकारी कैलास मोरे, अर्जुन वेताळ, संदिप दोंदे, देवचंद केदारे, शंकर कनकुसे, संदीप मालोकर यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला.