आर्थिक वर्ष २०२२-२३ इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्यास सुरवात … तुमच्या आर्थिक व्यवहारांवर आयकर विभागाची राहील कडक नजर … सावधान…. रिटर्न दाखल करण्यापूर्वी घ्या काळजी नाहीतर येऊ शकते आयकर विभागची नोटीस….!

लाल दिवा : करदात्यांना त्यांच्या व्यवहारांची ऐच्छिक परिपूर्तता करण्यासाठी व कर चोरीला लगाम लावण्यासाठी आयकर विभाग विविध उपाय योजना करत आहेत याचाच एक भाग म्हणून आयकर विभागाच्या ई-पोर्टलवर AIS/26AS द्वारे तुमच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उपलब्ध करून दिली जाते. विविध स्रोतांच्या/डेटाच्या माध्यमातून आयकर विभागाला तुमच्या आर्थिक व्यवहार बद्दलची माहिती प्राप्त असते TDS/TCS आकर्षित करणाऱ्या पावत्या, स्थावर मालमत्ता खरेदी किंवा विक्री, बँक ठेवी, शेअर्स/म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, मुदत ठेवी, पोस्ट खात्यातील विविध स्कीम मध्ये केलेली गुंतवणूकी पासून होणारा फायदा व इतर अन्य स्रोतच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न, यासोबतच विदेश यात्रा व रक्कम रु. १० लाख रुपयांवरील वाहन खरेदीतची माहिती तुमच्या आयकर खात्याच्या AIS/26AS पोर्टलवर उपलब्ध असते. त्यामुळे रिटर्न दाखल करतेवेळी तुम्ही तुमच्या उत्पन्नाची खात्रीपूर्वक सर्व माहिती दिली देऊन कराचे योग्य पद्धतीने मूल्यमापन केले आहे हे पाहणे गरजेचे आहेत. 

 

तुम्ही दाखल केलेल्या रिटर्नचे आयकर विभागाकडून तपासणी केली जाते यात जर काही तफावत आढळ्यास आयकर विभागामार्फत तुम्हाला नोटीस बजावली जाऊ शकते व तुम्हाला विचारलेली माहिती सादर करावी लागते. यात जर तुमची चूक आढळ्यास आयकर विभागाकडूनकार्यवाही केली जाते व तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंड हि भरावा लागू शकतो. याकरीता रिटर्न भरते वेळी कोणतीही माहिती लपवू नका तुमच्या आर्थिक व्यवहाराची पुरेपूर माहिती तुमच्या कर/आर्थिक सल्लागार यांना द्या व भविष्यात आयकर विभागाकडूननोटीस येणार नाही याबाबत व्हा…!

                           सुनिता कातकाडे

                            कर सल्लागार

                               नाशिक

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!