संघर्षातूनच साहित्याची निर्मिती होते.डॉ. नंदकुमार राऊत…!
नाशिक ता. ३१ आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. त्या संघर्षातून जेव्हा काही निर्माण होते. ते सुंदर असते आणि तेच संघर्ष जिवनाला आकार देत असतात त्याच संघर्षातून साहित्याची निर्मिती होते.असे विचार पुस्तकावर बोलु काही या उपक्रमात डॉ. नंदकुमार राऊत यांनी मांडले.
रौप्य महोत्सवी गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या पुस्तकावर बोलु काही उपक्रमात दौशाड या साहित्यकृतीवर त्यांनी हुतात्मा स्मारकात संवाद साधला न्यायाधीश वसंत पाटील अध्यक्षस्थानी होते.
डॉ. नंदकुमार राऊत पुढे म्हणाले दौशाड म्हणजे जगण्याची जिद्द आहे. जे होत ते चांगले होतं,जे आहे ते उतम आहे आणि पुढे जे काही असेल अती उतम असेल हेच दौशाड ने शिकवलं यालाच आयुष्याचं गणीत सोडवणे म्हणतात. दुष्काळी भागात पाण्याविना नेहमी हिरवेपण जपुन ठेवणारी वनस्पती आपल्याला जगण्याचा मंत्र देते.म्हणून आपण आयुष्यात वेगळी जागा निर्माण करु शकलो याचा आनंद साठवता आला हेच सुंदर जगणं मला मिळाले असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.
सावळीराम तिदमे आणि,अरुण घोडेराव या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. आभार प्रशांत केंदळे यांनी मानले.सुरेश पवार यांनी सुत्रसंचालन केले
दरम्यान, या उपक्रमात येत्या मंगळवारी ( दि.४ जुन) रोजी प्रा.गंगा गवळी यांच्या धुनीवरल्या गोठी या साहित्यकृती वर आपले विचार मांडणार आहेत.