देवळाली कॅम्प पोलीसांची पुन्हा चांगली कामगिरी चोरीच्या १९ मोटार सायकली शोधुन काढल्या
लाल दिवा, ता. १० : अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी आयुक्तालय हद्दीत घडणाऱ्या चोरी, मोटार सायकल चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे संबधांने वेळोवेळी आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-२ ), अंबादास भुसारे, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुंदन जाधव व इतर अधिकारी अंमलदार गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत होते.
दिनांक ०८.०५.२०२३ रोजी गुन्हेशोध पथकाचे पोहवा सुनिल जगदाळे, पोहवा रमाकांत सिध्दपुरे, पोहवा श्याम कोटमे, पोहवा सुरेश तुपे, पोना सुभाष जाधव, पोना राहुल बलकवडे, पोना नितीन करवंदे, पोशि विजय कोकणे, पोशि एकनाथ बागुल, पोशि दिपक जठार हे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. ३१ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ या गुन्हयातील अटक आरोपी नामे किरण राजु गांगुर्डे रा. चुंचाळे याने गुन्हयाचे तपासा दरम्यान दिलेल्या माहिती नुसार गुन्हयातील रिसीव्हर व पाहिजे आरोपी नामे तुषार उर्फ वाळया संपत गायकवाड, वय १९ वर्ष, रा. भेंडाळी औरंगपुरा, ता. निफाड, जि. नाशिक याचा शोध घेत फिरत असताना, पोहवा १०५३ कोटमे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहितीनुसार सायखेडा, भेंडाळी रोडवरील एका लॉन्सवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने मा. वरिष्ठांचे आदेश घेवुन सदर ठिकाणी सापळा लावण्यात आला. सदर ठिकाणी नमुद पाहिजे आरोपी आल्याने त्यास लागलीच ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने, आरोपी किरण राजु गांगुर्डे रा. चुंचाळे याचेकडुन मागील दोन | वर्षात वेळोवेळी त्याचेकडील चोरीच्या मोटारसायकली घेवुन त्या भेंडाळी, चापडगाव, निफाड, दिंडोरी या परिसरात | विकल्याची कबुली दिली. त्यावरून तपास पथकाने नमुद ठिकाणी जावुन आरोपी तुषार उर्फ वाळया संपत गायकवाड याने विकलेल्या एकुण १० मोटारसायकली ताब्यात घेतल्या. यापुर्वी नमुद आरोपींकडुन ९ मोटार सायकल व ३ रेसर सायकल जप्त करण्यात आल्या होत्या.
अशा प्रकारे आरोपी किरण राजु गांगुर्डे व त्याचे साथीदार नामे १) गौरव गणेश लहामटे वय २४ वर्ष रा. टाकेद बुद्रुक, ता. इगतपुरी २) विधीसंघर्षीत बालक नामे गणेश आनंद गुप्ता रा. खालचे चुंचाळे, अंबड, नाशिक यांनी चुंचाळे व अंबड परिसरातुन वेळोवेळी मोटार सायकल चोरी करून आतापावेतो १९ मोटार सायकली व ०३ रेसर सायकली किंमत रूपये ५,०१,०००/- किंमतीच्या आरोपी तुषार उर्फ वाळया संपत गायकवाड, वय १९ वर्ष, रा. भेंडाळी औरंगपुरा, ता. निफाड, जि. नाशिक यास विकल्या असुन त्याने सदर मोटार सायकली नाशिक जिल्हयातील विवीध गाव-खेडयांमध्ये “गाडीचे कागदपत्र नंतर देतो” असे खोटे सांगून क्षुल्लक किंमतींना विवीध शेतकऱ्यांना विकल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे १) गौरव गणेश लहामटे वय २४ वर्ष रा. टाकेद बुद्रुक यास यापुर्वी अटक करण्यात आली असून पाहिजे आरोपी नामे तुषार उर्फ वाळया संपत गायकवाड, वय १९ वर्ष, रा. भेंडाळी औरंगपुरा, ता. निफाड, जि. नाशिक | यास अटक करण्याची कारवाई देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन कडुन सुरू आहे. गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोना १७६५ बलकवडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे आदेशाने व मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ – २),. अंबादास भुसारे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुंदन जाधव यांचे सुचनेप्रमाणे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली असून सदर कामगिरीबाबत मा. वरिष्ठांनी देवळाली कॅम्प पोलीसांचे कौतुक केले आहे.