शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा; प्रभाग २४ मध्ये डास निर्मूलन मोहीम सुरू; गोविंदनगरमध्ये औषध फवारणी

नाशिक, दि. १० – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या इशार्‍यानंतर महापालिकेकडून प्रभाग क्रमांक २४ मध्ये बुधवारपासून डास निर्मूलन मोहीम सुरू झाली आहे. नंदिनी नदी, प्रभागातील नाले, तसेच रहिवाशी सोसायट्यांच्या परिसरात डास अळीनाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. या फवारणीचे दिवसही जाहीर करण्यात आले. सलग तीन दिवसात संपूर्ण प्रभागात सायंकाळी धूर फवारणी करण्यात येणार आहे. महापालिका मलेरिया विभागाचे आभार मानण्यात आले. 

 

 प्रभाग २४ मध्ये त्वरित डास निर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने मंगळवारी, ९ मे रोजी निवेदनाद्वारे महापालिकेकडे करण्यात आली होती. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांच्या सूचनेने बुधवार, १० मेपासूनच प्रभागात डास निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली. नंदिनी नदी, मंगलमूर्तीनगर, शिवालय कॉलनीजवळील नाला, गोविंदनगरमधील प्रकाश पेट्रोलपंप, चंद्रवेल अपार्टमेंट, संत निरंकारी भवन, महात्मा फुले सभागृह, पिंपरीकर हॉस्पिटल, करंदीकर हॉस्पिटल, मनोहरनगर, शारदा निकेतन, स्वस्तीश्री अपार्टमेंट, नवकार हॉस्पिटल, न्यू एरा स्कूल, पंचशील अपार्टमेंट, शिवसागर अपार्टमेंट परिसर, सिद्धीविनायक कॉलनी, शिवालय कॉलनी, खांडे मळा आदी भागात डासांची उत्पत्तीस्थाने शोधून फवारणी करण्यात आली. संपूर्ण प्रभागात ठिकठिकाणी सलग तीन दिवस सायंकाळी धूर फवारणी करण्यात येणार आहे.  

 

*या दिवशी होणार डास अळीनाशक फवारणी*

 *बुधवार-* गोविंदनगर. *गुरुवार-* सद्गुरूनगर, सदाशिवनगर, भुजबळ फार्म, सुंदरबन कॉलनी, झिनत कॉलनी, फिरदोस कॉलनीचा संपूर्ण परिसर. *शुक्रवार-* महाराणाप्रताप चौक महापालिका दवाखाना परिसर, तुळजाभवानी चौक, हरेश्वर चौक, महात्मा फुले चौक, खोडे मळा, वृंदावन कॉलनी, खांडे मळा, सिद्धीविनायक कॉलनी, साई शिल्प रो हाऊस व शिवालय कॉलनी व तेथील नाला, लासुरे हॉस्पिटल हा संपूर्ण परिसर. *शनिवार-* जिव्हाळा संकुल, आर्यावत, हनुमान चौक, लक्ष्मीनारायण मंदिर, कालिका चौक, ओंकारेश्वर चौक, कृष्णबन कॉलनी, बेळे मळा, काशिकोनगर, नयनतारा सिटी १ व २, कर्मयोगीनगर, मित्तल हाईट्स, योगेश्वरनगर, विधातेनगर, बाजीरावनगर, नवीन तिडके कॉलनी, ऋग्वेद मंगल कार्यालय, लंबोदर, अव्हेन्यू अपार्टमेंट, मंजुळा मेडिकल परिसर. सोमवार-अनमोल व्हॅली, नंदिनी नदी, तिडकेनगर, जगतापनगर, कालिका पार्क, पाटील पासुडी, नाईक मळा. *मंगळवार-* प्रियंका पार्क, औदुंबर वाटिका, कर्मयोगीनगर, सिरेनिटी हाईट्स, कोठावळे मळा, बोंबले मळा, इच्छामणी कॉलनी, बडदेनगर, माणिक लॉन्स परिसर. 

 

*—०००—*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!