गुन्हे शाखा युनिट २ च्या छाप्याने इंदिरानगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह……. अल्को मार्केट येथे जुगार खेळणारे मुद्देमालासह ताब्यात…….!
लाल दिवा.. .. इंदिरानगर पोलीस ठाणे हददीत राजीव नगर मुंबई आग्रा हायवे लगत भगतसिंग नगर वसाहती मधील म्हसोबा मंदिरा लगत इसम नामे १) हरिचंद्र पेशुमल भोजवाणी उर्फ हरी शेठ, रा.हा. दत्त चौक, विजयनगर, सिडको, नाशिक, २) रंगनाथ रामभाऊ साबळे, रा. भगतसिंग नगर, राजीवनगर, नाशिक, ३) आसिफ मोहम्मद पटेल, रा. चाटोरी ता. निफाड जि. नाशिक, ४) सुभाष रघुनाथ काळे, रा. हल्ली मु.सावरकर चौक, महाराणा प्रताप चौक, सिडको, नाशिक मुळ गाव ओतुर ता. कळवण जि. नाशिक, ५) शाम सिताराम गवे, शिवपुरी चौक, उत्तमनगर, सिडको, नाशिक, ६) अन्वर अब्दुल करीम पठाण, वय ४५ वर्षे, रा. हल्ली मु. सावरकर चौक, महाराणा प्रताप चौक, सिडको, नाशिक मुळ रा. दाणी चौक, वाकड, पुणे हे स्वतःचे फायदयासाठी कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना मिळून आल्याने त्यांना जुगाराची साधने व रोख रूपये ७,१००-रू अशा मुद्देमालासह ताब्यात घेवून त्यांचेविरूध्द इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र.२ कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार शंकर काळे, नंदकुमार नांदुर्डीकर, पोहवा परमेश्वर दराडे, सुनिल आहेर, वाल्मीक चव्हाण, पोहवा प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजीरे अशांनी केलेली आहे.