तलवार व कुकरी प्राण घातक शस्त्र अवैद्यरित्या बाळगणारे दोन इसम ताब्यात ……गुन्हे शाखा युनिट -२ ची कामगिरी….!

लाल दिवा : गुन्हे शाखा युनिट-२कडील नेमणुकीचे विजय वरंदळ यांना गोपनीय माहिती प्राप्त झाले की अंबड पोलीस ठाणे हद्दीत पेलिकन पार्क शेजारी असलेल्या ओमसाई गॅरेज जवळ इसम नामे सौरभ पाटोळे हा कमरेला पाठीमागील बाजूस पॅन्ट मध्ये लोखंडी कुकरी लावून फिरत आहे. अशी बातमी मिळाल्याने ASI/बेंडकुळे,  HC/राजेंद्र घुमरे, नंदकुमार नांदुर्डीकर, विवेक पाठक, संजय सानप, विजय वरंधळ, चंद्रकांत गवळी अशांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले असता त्याचे कमरेला वरील प्रमाणे प्राण घातक हत्यार मिळून आले..

त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव सौरभ अशोक पाटोळे वय वर्ष23, रा. सेक्टर नंबर 2, फ्लॅट नंबर 3 राणेनगर, अंबड नाशिक असे सांगितले त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करतात ओम साई गॅरेज च्या पाठीमागे अडगळीच्या ठिकाणी तीन तलवारी लपवून ठेवलेल्या असल्याचे सांगितले तसेच अधिक चौकशी करता सदरच्या तलवारी माझा मित्र सुशील अशोक गांगुर्डे वय वर्ष 40 राहणार N/32/N/R/6/1 स्वामी विवेकानंद नगर, सिडको नाशिक यांनी दिलेल्या असल्याचे सांगितले असा एकूण एक लोखंडी कुकरी, 3 तलवारी एकूण किंमत5,000/-प्राण घातक शस्त्र मिळून आले आहे. सदरची कार्यवाही ASI/बेंडकुळे पो.ना. गुलाब सोनार HC/राजेंद्र घुमरे, नंदकुमार नांदुर्डीकर, विवेक पाठक, विजय वरंदळ, चंद्रकांत गवळी,संजय सानप, प्रशांत वालझाडे, सुनील आहेर,अशांनी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील प्राण घातक शस्त्र यांचा , पंचनामा कारवाई करून अंबड पोलीस ठाणे कडे पुढील तपास कामी वर्ग केले आहे

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!