गुन्हे शाखा युनिट २ ची विशेष धमाका……..५,६०,००० रूपये किमंतीच्या चोरीच्या मोटार सायकल ०२ आरोपी ताब्यात घेवून ०८ गुन्हे उघडकीस आणले …!
लाल दिवा-नाशिक,१२ : दिनांक १२ रोजी पोहवा गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनिय बातमी अन्यये पोउपनि संदेश पाडवी, पोउपनि शेळके, पोहवा राजेंद्र घुमरे, पोहवा गुलाब सोनार, पोहवा शंकर काळे, पोहवा प्रशांत वालझाडे पोहवाअतुल पाटील, पोना जितेंद्र वजीरे यांनी योगेश शिवाजी दाभाडे वय २३ वर्ष रा वळसाने ता सात्री जि धुळे हल्ली रा. मेदनगरवाडी, चाकण, पुणे, निलेश पुंडलीक चव्हाण वय २३ वर्ष रा पत्राळ, नाभडगाव, जि. जळगाव हल्ली रा. शास्त्री चौक, आळंदीरोड, भोसरी, पुणे यांना चौकशी कामी साच्यात घेतले. त्यांचेकडे बारकाईने व कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर इसमांनी नाशिक शहर व पिंपरी चिंचवड परिसरातून मोटार सायकली चोरी केल्या असल्याचे सांगून सदरच्या मोटार सायकल दिल्या. त्यायातील प्रमाणे
- (१) मुंबई नाका पोलीस ठाणे कडील गुरन ४४७/२३ भादवि कलम ३७९ मधील युनिकॉर्न मोटार सायकल
- २) सातपूर पोलीस ठाणे कडील गुरन ३३३/२३ भादवि कलम ३७९ मधील बुलेट मोटार सायकल
- ३) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन कलम ७३६/२३ भादवि कलम ३७९ मधील स्प्लेंडर मोटार सायकल
- ४) भोगरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरम ७४६/२३ भादवि ३७९ मधील प्र मोटार सायकल
- ५) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन ८८१/२३ भाविक ३७९ मधील होंडा शाईन मोटार सायकल
- (६) भोसरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन ४४८/२३ भाविक ३०९ मधील होंडा शाईन मोटार सायकल
- (७) दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय कडील गुरन ४६१ २३ भादवि ३७९ मधील स्प्लेंडर प्लस मोटार सायकल
- (८) भोरारी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतून चोरलेली मोटार सायकल.
येणे प्रमाणे आरोपी नामे योगेश दाभाडे व निलेश चव्हाण या दोघांचे कब्जातू ५,६०,०००/- रु कि.च्या ०८ मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या असून संबंधीत पोलीस ठाण्यांत पुढील कार्यवाही करीता वर्ग करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक, डॉ. सिताराम कोल्हे. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक श्री. रणजित नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली, पोउपनि / संदेश पाडवी, प्रसाद रणदिवे,पोउपनि / अजय पगारे, सपोउपनि / बालु शेळके, यशवंत बेडकोळी, पाहवा / राजेंद्र घुमरे, गुलाब सोनार, शंकर काळे, प्रशांत वालझाडे, प्रकाश दोडके, विजय वरदळ, बाळु शार्दुल, संजय सानप, संपत सानप, अतुल पाटील पोना / नितीन फुलमाळी, पोअ / संजय पोटीदे यांनी केलेली आहे.