सावकारीच्या छळाला कंटाळून चहावाल्याची आत्महत्या!

१२ लाखांवर दंड २० लाख, वैभव देवरेच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या!

लाल दिवा-नाशिक,दि.२० :- (प्रतिनिधी) “तु मेला तरी चालेल, पैसे आणि जमीन हवीच!” अशा धमक्या देत सावकारीच्या जाचाला कंटाळून ‘डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदुरी घाटाजवळील जंगलात १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्याजवळ आत्महत्येची कारणीभूत ठरणारी चिठ्ठीही सापडली आहे.  

गीतांजली धीरज पवार यांनी पतीच्या मृत्युनंतर गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. वैभव देवरे, त्याची पत्नी सोनल देवरे आणि त्यांचा साथीदार निखील पवार असे तक्रारीत नावे आहेत.  

व्यवसायासाठी लागणारी रक्कम उभी करण्यासाठी मृतक धीरज पवार यांनी वैभव देवरे याच्याकडून एप्रिल २०२३ मध्ये १२ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. सुरुवातीला व्यवस्थित हप्ते फेडले; मात्र नंतर काही आर्थिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. याचा गैरफायदा घेत वैभव देवरे आणि त्याच्या साथीदारांनी धीरज यांना धमक्या देणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. व्याजाची रक्कम न दिल्यास कळवण तालुक्यातील वडीलोपार्जित जमीन लिहून देण्याचा दबाव टाकला जात होता.  

दरम्यान, वैभव देवरे विरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीही बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, जामिनावर तो पुन्हा त्याच धंद्यात सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
4
+1
1
+1
7
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!