गुन्हे शाखा युनिट १ ची जबरदस्त कामगिरी……नाशिक शहरातुन दोन वर्षासाठी तडीपार केलेला इसम जेरबंद…!

लाल दिवा : मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांनी नाशिक शहरातुन तडीपार करण्यात आलेल्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत सक्त सुचना दिल्या होत्या.

 

त्या अंनुषगाने दि. २८/०१/२०२४ रोजी युनिट क. १, नाशिक शहर कडील सहा. पोउनि / रविंद्र काशीनाथ बागुल, पोहवा / ३६७ प्रदिप म्हसदे, पोहवा /१०९ प्रविण वाघमारे, पोहवा /१८८३ विशाल काठे, पोहवा /१३१६ नाजीम पठाण, पोना/१९०० विशाल देवरे असे त्यांचे खाजगी वाहनाने गुन्हे प्रतिबंधक गस्त फिरत असतांना सहा. पोउनि / रविंद्र काशीनाथ बागुल यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने इंदिरानगर पोलीस स्टेशन कडुन हद्दपार करण्यात आलेला इसम नामे शौकत सुपडु शहा हा भारतनगर येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली असता त्यांनी सदरची बातमी पो. निरी. विजय ढमाळ यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी भारतनगर दर्गाजवळील, गुलामच्या चहा टपरीजवळ, नाशिक येथे सापळा लावून थांबलेलो असतांना इसम नामे शौकत सुपडु शहा, वय-२६वर्षे, रा. गल्ली नं. २, सादीकनगर, वडाळागाव, नाशिक यास नाशिक शहर तसेच नाशिक ग्रामीण हद्दीतुन २ वर्षाकरीता तडीपार केलेले असतांना तो सदर ठिकाणी वावरतांना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे सपोउनि / रविंद्र बागुल यांनी मुंबईनाका पोलीस ठाणेस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे फिर्याद देवून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास मुंबईनाका पोलीस स्टेशन करीत आहे.

 

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक साो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा.डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, पोउनि/विष्णु उगले, चेतन श्रीवंत, सहा. पोउनि / रविंद्र काशीनाथ बागुल, पोहवा/प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाजीम पठाण, पोना/ विशाल देवरे, प्रशांत मरकड, पोअं/जगेश्वर बोरसे, मपोअं/ अनुजा येलवे अशांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!