गुन्हे शाखा युनिट १ ची जबाबदारी घेताच मधुकर कड यांनी केली कमाल…….. अपहरण करुन बारा लांखांची खंडणी उकळणारी टोळी जेरबंद……. अंबड लिंक रोड व म्हसरूळ येथील दोन आरोपींना अटक…..!
लाल दिवा-नाशिक,ता.१० 🙁 दि,०४) मार्च २०२४ रोजी बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे इरटीगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांचे अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवुन अपहरण करून फिर्यादींचे दोन एटीएमचा वापर करून बळजबरीने ३०, हजार रू. काढून घेतले, तसेच फिर्यादीला धमकावून त्यांचे पत्नीकडून बारा लाखांची रक्कम खंडणी उकळून फिर्यादी यांना दुसऱ्या दिवशी देवास, मध्यप्रदेश येथे सोडले होते, त्यावरून म्हसरूळ पोलीस स्टेशन, गुरनं-५४/२०२४ भादविक ३६३,३६४,३८६,३८७,३९५ व आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त, गुन्हेशाखा प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा सिताराम कोल्हे, यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना वेळोवळी सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
सदर गुन्हयाचा गुन्हेशाखा युनिट क. १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळावर भेट
देवुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार महेश साळुके, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे अशांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे नाव निष्पन्न करून सदर गुन्हा हा तुषार खैरणार, अजय प्रसाद, आदित्य सोनवणे व त्यांचे साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न करून सदरची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांनी दोन पथक तयार करून त्यांना आरोपी पकडण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क. १ कडील सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांचेसह पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, अमोल कोष्ठी, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ तसेच पोलीस उपनिरीक्षक/रविंद्र बागुल यांचेसह पोलीस हवालदार विशाल काठे, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे असे दोन पथके तयार करून खाना केले होते.
सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर व पथक यांनी अंबड लिंक रोड, दत्तमंदिराजवळ इसम नामे नाव आदित्य एकनाथ सोनवणे
वय-२४ वर्षे रा. म्हाडा कॉलनी, अंबड लिंकरोड, नाशिक, यास पकडून त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन यामाहा कंपनीची मोपेड मो.सा., अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, दोन सोन्याच्या कानातील रिंगा, रोख रक्कम रूपये २९, हजार ५००
. असा एकुण १, लाख ५९,००० रूपये किमतीचा मुदद्देमाल हस्तगत केला. पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल यांचे पथकाने आरोपी नामे १) तुषार केवल खैरनार वय-२८ वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्ट,
म्हसरूळ नाशिक, २) अजय सुजीत प्रसाद वय-२४ वर्षे रा. अंबड लिंकरोड, नाशिक अशानां म्हसरूळ लिंक रोड येथे सापळा लावुन पकडले, त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यातुन शेवरलेट कंपनीची कुझ कार, व्हीवो कंपनीचा मोबाईल फोन, अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ३, लाख ८७ हजार रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्हयामध्ये नमुद आरोपीतांकडुन एकुण ६, लाख १६,रूपये किमतीचा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपीतास पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असुन उर्वरीत पाहिजे आरोपीतांचा शोध घेवुन अटक करत आहोत.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, सिताराम कोल्हे, पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक विष्णु उगले, चेतन श्रीवंत, रविंद्र बागुल, पोलीस हवालदार महेश साळुंके, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, विशाल काठे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोरकर, नितीन जगताप, अमोल कोष्ठी, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राजेश राठोड, संदिप भांड, योगीराज गायकवाड, महिला पोलिस अंमलदार अनुजा येलवे, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ, पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केलेली आहे. तसेच सदर गुन्हा उघड आणण्यासाठी तांत्रिक विश्लेषण शाखा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाकिर र्मिझा, पोलीस हवालदार राणे, पोलीस अंमलदार भुषण देवरे यांनी योग्य ते सहकार्य केले आहे.