गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी……. शहरात सोनसाखळी चोरी करणारे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार जेरबंद…… अवैध अग्निशस्त्रासह सोनसाखळी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस….! लाल दिवा…!
लाल दिवा-नाशिक,ता.३ : मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरात घडणा-या सोनसाखळी चोरी करणा-या आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार गुन्हेशाखा युनिट कमांक १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार नाशिक शहरामध्ये घडणा-या सोनसाखळी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सतत सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणद्वारे प्रयत्न करीत असतांना दिनांक ३०/११/२०२३ रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोअं/२५४४ मुक्तार शेख गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार महेश जाधव व त्याचा साक्षीदार हा अवैध अग्निशस्त्र विक्री करता लाखलगाव परिसरात येणार असल्याची बातमी मिळाली होती.
सदरची माहीती पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी वपोनिरी श्री. विजय ढमाळ यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, पोहवा /१०९ प्रविण वाघमारे, पोहवा /९०० संदिप भांड, पोहवा /२२१ योगीराज गायकवाड, पोहवा / ७३९ देविदास ठाकरे, पोना/१८८३ विशाल काठे, पोना/१९०० विशाल देवरे, पोअं / १४०५ आप्पा पानवळ अशांनी सदर ठिकाणी आलेल्या दोन इसमांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले. सदर इसमाचे नांव १) महेश चंदु जाधव, वय-२४वर्ष, रा-चेहडी पपिंग नाशिकरोड, नाशिक, २) भारत उर्फ सोनु मनोहर चावरे, वय-३१वर्षे, रा-लाखलगाव ता. जि. नाशिक असे असल्याचे सांगुन त्याचेकडुन ०१ देशी बनावटीचे पिस्तोल, ०५ जिवंत काडतुसे, ०१ चाकु, ०१ मोटार सायकल असा एकुण ८३,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला तो जप्त करून आडगाव पोलीस ठाणे येथे सदर आरोपीतांविरूध्द भा. ह. का कलम ३/२५, ५/२५ व म.पो.का कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडे चैन स्नेचिंगचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता आरोपी महेश जाधव याने चैन स्नेविंग केल्याची कबुली देवुन सोने आरोपी सोनु चावरे याचे मार्फत विक्री केल्याचे कबुली दिली. त्यावरून नाशिक शहरातील १३ सोनसाखळीचे गुन्हे त्यात उपनगर पो.स्टे कडील ६, नाशिकरोड पो.स्टे कडील २, म्हसरूळ पो.स्टे कडील २, पंचवटी पो. स्टे कडील १, मुंबईनाका पो.स्टे कडील १, इंदिरानगर पो.स्टे कडील १ असे गुन्हे उघडकीस आणले असुन त्यांच्याकडुन एकुण १९० ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल किंमत १२,००,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्हयाच पुढील तपास पोउनि/चेतन श्रीवंत, गुन्हेशाखा युनिट कमांक १, नाशिक शहर हे करीत आहेत..
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक सो., मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, पोहवा/१०९ प्रविण वाघमारे, पोहवा/९०० संदिप भांड, पोहवा /२२१ योगीराज गायकवाड पोहवा / ७३९ देविदास ठाकरे, पोहवा /१८८३ विशाल काठे, पोहवा/८७९ महेश साळुंके, पोना/१९०० विशाल देवरे, पोअं/२५४४ मुक्तार शेख, पोअं/१४०५ आप्पा पानवळ, पोअं/२२६० जगेश्वर बोरसे, पोअं/२१५४ राहुल पालखेडे, पोअं/२२७३ अमोल कोष्टी अशांनी केलेली आहे