आयुक्त साहेब ! अंबड पोलीस ठाण्यात नेमकं चाललंय तरी काय ? लॉकअप मध्ये संशयिताने केला आत्महत्येचा प्रयत्न …!
लाल दिवा : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाला जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यामध्ये असलेल्या संशयिताने चक्क पोलीस ठाण्याच्याच लॉकअप मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याने अशावेळी पोलीस नेमकं करत तरी काय होते ? असा प्रश्न समस्त नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करून पोलीस आयुक्तांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की विशाल संतोष कुराडे (१९, रा. चुंचाळे घरकुल योजना अंबड, नाशिक) याच्यावर वाढदिवसाचा केक कापत असताना एकावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी पाच ते सहा जणांसहअंबड पोलीस ठाणे अंकित एमआयडीसी चिंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित कुराडे हा पोलीस कोठडीत असताना त्याने पोलीस कोठडीमध्ये असलेल्या शौचालयामधील फरशीच्या साह्याने हाताला कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कुराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
चौकट
गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोक वर काढले आहे. कोष्टी गोळीबार प्रकरण, सावता नगरला युवकाचा झालेला खून, कोयता गँग चा धाक ! अशा एक ना अनेक प्रकरणामुळे सिडको, अंबड व चुंचाळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक भयभीत झाले आहेत.
चौकट
अंबड पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्ये संशयिताने फरशीला हत्यार बनवत आत्महत्याचा प्रयत्न केला. ही बाब पटण्यासारखी नसली तरी फरशी ही हत्यार असू शकते का ? आणि जर फरशीने असा प्रकार झाला असेल तर यापुढे न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीत राहणारा संशयित आरोपी सुरक्षित आहे का ?असा प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण होत आहे