शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल’ लोकार्पित होणार!
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री मुंडे उपस्थित राहणार
लाल दिवा-नाशिक,दि.२ : -राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम) आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, मा.ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्वकांक्षी प्रकल्प असलेले **’छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल’** हे येत्या शुक्रवारी, 4 ऑक्टोबर 2024 रोजी लोकार्पित होत आहे. या संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन दुपारी 1.00 वाजता काष्टी फाटा, नामपुर रोड, मालेगाव येथे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या भव्य समारंभास उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार आणि कृषी मंत्री मा.ना. धनंजयजी मुंडे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या संकुलाच्या उद्घाटन सोहळ्यास सर्व शेतकरी बांधव, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकास पर्वाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल’हे शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, ज्ञान आणि संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वाचे केंद्र ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि शेती क्षेत्राला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.