मोठी बातमी; देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस पोलिसांनी केले जप्त ; विशेष पथक गुन्हे शाखेची कामगिरी….!

लाल दिवा -नाशिक,ता.१४ :-पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर हददीत लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणारे इसमांवर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 

विशेष पथक गुन्हे शाखा, नाशिक शहर कडील पोलीस नाईक दत्तात्रय चकोर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे (दि,११) मे रोजी ३:३० वाजेच्या सुमारास गट क्रमांक ०७, पवार कॉलनी, महालक्ष्मीनगर, मखमलाबाद, नाशिक या ठिकाणी इसम नामे अनिल गणेश पंडीत वय-२१ वर्षे, रा. फ्लॅट नं ०८, पहिला मजला, साई अपार्टमेंट, आर टी ओ ऑफिसजवळ, अशवमेध कर्वनगर, पंचवटी नाशिक स्वतःचे कब्जात देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ०१ काडतुस बाळगतांना तसेच मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे उल्लंघन केल म्हणुन त्याचेविरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र शस्त्र बंदी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाणे हे करीत आहे.

 

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे व वपोनि. जयराम पायगुडे विशेष पथक गुन्हे शाखा, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि हेमंत नागरे, पोउनि. मुक्तेश्वर लाड, श्रे. पोउनि. दिलीप भोई, . पोउनि. दिलीप सगळे, पोहवा डंबाळे, पोना. चकोर, दिघे, जाधव, निकम, फुलपगारे, चव्हाण, गणेश वडजे तसेच म्हसरूळ पोलीस ठाणेकडील पोउनि. उध्दव हाके व प्रशांत देवरे यांनी केलेली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!