जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून…..आशिमा मित्तल यांच्यावर अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
लाल दिवा : नाशिक जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून मल्हार खाण येथील अनिकेत निकाळे याने हातात ज्वलनशील पदार्थ घेऊन आत्महत्या करण्याची धमकी देत होता. वारंवार तो मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्यावर अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्याचे बोलत होता. त्याला कर्मचारी खूप समजावण्याचा प्रयत्न देखील करत होते. अगं त्याच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी याबाबत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.
या घटनेबाबत मित्तल यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या इमारतीवर एक इसम हातात ज्वलनशील पदार्थ घेऊन चढला. त्याने या कृत्याने लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समोर येताच जिल्हा परिषदेत सर्वांची धावपळ झाली. ही व्यक्ती दररोज जिल्हा परिषदेत येऊन विनाकारण आरडाओरड करतो.
या संदर्भात पोलिस प्रशासनाला यापूर्वी पत्र देखील देण्यात आले आहे. आज झालेला प्रकार हा गंभीर असून यासंदर्भात पोलिस कारवाई करत गुन्हा दाखल करण्याबाबतचे निर्देश मी सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत, असे त्या म्हणाल्या.