बदलापूर अत्याचार प्रकरण: जीपमधून कोर्टात जाताना… अन् ‘त्याने’ डागली गोळी!

पोलिसांना चकवून पळून जाण्याचा प्रयत्न, अक्षय शिंदे गंभीर जखमी

लाल दिवा ठाणे,दि .२३ : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेने आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ट्रान्झिट रिमांडमध्ये असलेल्या शिंदेने पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेत स्वतःवर गोळी झाडली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बदलापूर येथील शाळेतील चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी शिंदेला अटक करण्यात आली होती. सोमवारी पोलिस त्याला जीपमधून नेत असताना त्याने एका पोलिस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पोलिसांवर तीन राऊंड फायर केले. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला ज्यात शिंदे जखमी झाला.  

या गोळीबारात एक पोलिस अधिकारीही किरकोळ जखमी झाला आहे. शिंदेने पोलिसांच्या बंदुकीनेच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!