सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांची ग्रँड एन्ट्री………गोवंश मांसची विक्री करीता वाहतुक करणारा इसम जेरबंद…..गुन्हेशाखा युनिट-२ ची कामगीरी….!

लाल दिवा : पोलीस आयुक्त संदिप कर्णिक प्रशांत बच्छाव साो. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे विशा) सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप मिटके साो (गुन्हे) यांनी अवैधरित्या गोमांस वाहतुक विक्री करणाऱ्या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.

 

त्या अनुषंगाने आज (दि.०५,)२०२४ रोजी युनिट कं २ कडील पो अंमलदार तेजस मते यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इंदिरानगर पोलीस स्टेशन हददीत, वडाळागांव, नाशिक येथे सेंट सादीक स्कुलकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम हा गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्याकरीता टेम्पो क्रमांक. एम.एच ४१ एयु ४०४९ हिचेत घेवुन येणार असले बाबत माहीती मिळाल्याने सदर बातमी ही पोनि/विदयासागर श्रीमनवार यांना कळविल्याने त्यांनी सदर बातमीची खात्री करून कारवाई करा असे आदेशीत केल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी छापा लावला असता एक इसम हा त्याचे ताब्यातील टॅम्पो नाशिक स्टिल ट्रेडर्स जवळ, वडाळागांव, नाशिक येथे घेवुनज जातांना दिसला त्यावरून बातमीची खात्री झाल्याने त्यास हात देवुन थांबविण्याचा इशारा करून थांबविले असता टेम्पो मधील इसम यांस त्याचे नांव गांव विचारले असता त्यांने त्याचे नांव अझहर सफदर खान, वय ३१ वर्ष, रा. सल्ली पॉईंट, राजवाडाजवळ, वडाळागांव, नाशिक असे सांगितले त्यांस ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील टेम्पो मध्ये काय आहे बाबत विचारले असता त्याने गोवंश जनावरांचे मांस असल्याचे सांगितले त्यास गोवंश जनावरांचे मांस कोठुन आणले व कोणी घेवुन जायला सांगितले तसेच टेम्पो कोणाच्या मालकीचा आहे या बाबत विचारले असता त्याने शोएब समद कुरेशी रा. वडाळागांव, नाशिक तसेच नाजीर, व बबलु कुरेशी पुर्ण नांव पत्ता माहीती नाही व अजीज कादीर कुरेशी यांनी मला टेम्पोत भरून विकण्यासाठी पाठविले असल्याचे सांगितले त्यास ताब्यात घेवुन सुमारे ७२५ कि. ग्रॅम. अंदाजे वजन असलेले मांस मिळाले तात्काळ पशु वैदयकीय अधिकारी यांना बोलावून मांस सॅम्पल साठी ताब्यात घेतले सदर चे मांस हे तो विक्री करण्याकरीता नेत असल्याचे निष्पन्न झाले त्यावर पंचनामा करून वाहनासह एकुन ६,४५,०००/- रू. किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन इसम नामे अझहर सफदर खान याचे विरूध्द महा. प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारित कलम २०१५ चे कलम ५ क, ५ ड भादंवि कलम-४२९,१८८ प्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाणेस पोअंमल/तेजस मते यांनी फिर्याद देवुन आरोपी यांस मुददेमालासह पो. ठाणेस ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

सदरची कामगीरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक/विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट कं.२ कडील पोहवा संजय सानप, मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, पो अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, तेजस मते, स्वप्निल जुंद्रे यांनी केलेली आहे..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!